Mumbai Metro One
Mumbai Metro One

मुंबई मेट्रो वनने ओलांडला 600 दशलक्ष प्रवाशांचा टप्पा

मुंबई : रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्‍चर संचालित `मुंबई मेट्रो वन`कडून नवा विक्रम नोंदवण्यात आला आहे. या विक्रमानुसार मुंबई मेट्रो वनने अवघ्या पाच वर्षे पाच महिन्यांत 600 दशलक्ष प्रवाशांना सेवा दिली आहे.

जागतिक दर्जाची सेवा, ग्राहककेंद्री नियोजन व सर्वोत्कृष्ट कार्यपद्धती यांचा वापर या जोरावर मुंबई मेट्रो वनने ही कामगिरी साध्य केली आहे. मुंबईकर प्रवाशांकडून मुंबई मेट्रो वनला प्रवासाचा सर्वांत लोकप्रिय पर्याय म्हणून प्राधान्य दिले जाते. मुंबई मेट्रो वनच्या प्रवाशांमध्ये 100 दशलक्षांची झालेली वाढ लक्षणीय आहे.

अंधेरी-वर्सोवा-घाटकोपर कॉरिडॉरमध्ये मुंबई मेट्रो वन ही प्रवाशांसाठी नवी जीवनवाहिनी झाली आहे. 100 दशलक्ष प्रवाशांचा पहिला टप्पा गाठण्यासाठी `मुंबई मेट्रो वन`ला 398 दिवस लागले होते. त्यानंतर पुढील 388 दिवसांत 100 दशलक्ष प्रवाशांची भर पडली; तर त्यापुढील 100 दशलक्ष प्रवासी केवळ 337 दिवसांत नोंदवले गेले. त्यानंतरच्या 300 दिवसांत आणखी 100 दशलक्ष आणि 273 दिवसांत 100 दशलक्ष प्रवाशांच्या पाचव्या टप्प्याची नोंद झाली. एकूण 600 दशलक्ष प्रवाशांच्या नोंदीचा विक्रम साडेपाच वर्षांत पूर्ण झाला.

दररोज मुंबई मेट्रो वनकडून 422 फेऱ्या चालवल्या जातात. गेल्या वर्षभरात गाड्या वेळेवर धावणे आणि उपलब्धतेच्या बाबतीतही उच्च दर्जाची कामगिरी झाली. ऑक्‍टोबर 2018 ते सप्टेंबर 2019 दरम्यान 1,35,248 फेऱ्या चालवल्या गेल्या. त्यात 99.99 टक्के ट्रेन वेळेवर धावल्या; तर त्यांची उपलब्धता 100 टक्के होती. पिक अवर पिक डायरेक्‍शन ट्रॅफिकमध्ये (पीएचपीडीटी) 25,326 प्रवाशांनी सेवेचा लाभ घेतला.

मुंबईतील पहिल्या मेट्रो मार्गिकेच्या माध्यमातून मेट्रो प्रवाशांना नवा अनुभव दिला आहे. आम्ही सातत्यपूर्ण पद्धतीने केलेल्या सुरक्षितता, स्वच्छता, विश्‍वासार्हता आणि आरामदायी अनुभव या प्रयत्नांच्या जोरावर प्रवाशांमध्ये मोठी वाढ नोंदली गेली आहे. प्रवासीकेंद्रित दृष्टिकोन आणि गुणवत्तेसाठी राखलेला जागतिक दर्जा यामुळे प्रवाशांसह जाहिरात क्षेत्रातील ब्रॅंड्‌स, रिटेल क्षेत्राकडूनही मुंबई मेट्रो वनला पसंती दिली जाते. नवनवे विक्रम साध्य होण्यात मुंबईकर प्रवाशांनी दिलेली साथ आणि पाठिंबा महत्त्वाचा आहे, असे मुंबई मेट्रो वनच्या प्रवक्‍त्याने नमूद केले.

प्रवाशांच्या संख्येत वाढ

600 दशलक्ष प्रवाशांचा टप्पा गाठतानाच विविध मार्गांवरील प्रवाशांच्या संख्येतही गेल्या वर्षभरात वाढ नोंदवण्यात आली. प्रवाशांची वाढ झालेल्या मार्गिकांमध्ये उपनगरांतील अंधेरी-घाटकोपर आणि कमी अंतरावरील स्टेशनांसाठी मेट्रो हा सर्वाधिक पसंतीचा पर्याय ठरला आहे. अंधेरी घाटकोपरसह साकीनाका (48,544), चकाला (38,154), मरोळ नाका (38,149), पश्‍चिम द्रुतगती मार्ग (28,038), विमानतळ रस्ता (21,398) या स्टेशनवर सर्वसाधारणपणे कामकाजाच्या दिवशी (वीक डेज) सर्वाधिक प्रवाशांची नोंद झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com