पुढील स्टेशन अंधेरी ! मुंबईकरांचा मेट्रो प्रवास सुरक्षित होण्यासाठी 'अशी' सुरु आहे तयारी, मुंबई मेट्रो लवकरच ट्रॅकवर येणार?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

अशी सुरू आहे मुंबई मेट्रोची तयारी

मुंबई : गर्दी ही मुंबईची ओळख असली तरी आता कोरोना विषाणूचा धोका पाहता गर्दी टाळत, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत सार्वजनिक वाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये घाटाकोपर ते वर्सोवा मार्गावर धावणारी मुंबई मेट्रो देखील मुंबईकरांच्या सेवेसाठी सज्ज होत आहे.

लॉकडाऊनंतर भविष्यात मेट्रो प्रवास अधिक सुकर व्हावा यासाठी आसन व्यवस्थेमध्ये बदल केले जाणार आहेत. प्रवासादरम्यान दोघांमध्ये सुरक्षित अंतर राहावं यासाठी आता एक आड एक आसन बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्यासाठी कोणत्या सीट राखीव असतील याची स्टिकर द्वारा माहिती दिली जाईल. 

दीड महिन्यांच्या कोरोनाग्रस्त बाळासाठी 'त्या' डॉक्टरांनी घेतली मोठी रिस्क, बाळ तर वाचलं पण डॉक्टर...

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह महराष्ट्रात 31 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे 22 मार्चपासून मुंबईची मेट्रो सेवा प्रवासी वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आली आहे. मेट्रोची वर्सोवा ते घाटकोपर दरम्यान 2014 पासून मेट्रो धावायला सुरूवात झाली आहे.

11.4 किमीच्या उन्नत मार्गावर वर्सोवा, डी.एन नगर, आझाद नगर, अंधेरी, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, जेबी नगर, एअर पोर्ट रोड, मरोळ नाका, साकीनाका, असल्फा,जागृती नगर व घाटकोपर अशी 12 स्थानके आहे. या दरम्यान दररोज साधारणपणे 400 फेऱ्या चालविण्यात येतात. प्रत्येक दिवशी तब्बल साडेचार लाख पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात.

मन विषण्ण करणारी परिस्थिती ! KEM मध्ये ही परिस्थिती येईल अशी कुणी कल्पनातरी केली असेल का?

मात्र आता दोन महिन्यांनंतर लॉकडाऊन उठवल्यानंतर नव्या नियमांसह मुंबईची मेट्रो प्रवाशांसाठी खुली होण्याची शक्यता आहे. यामध्ये कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका कमी करण्यासाठी सामाजिक अंतर पाळून मेट्रो सुरू करण्यात येणार आहे.

उपायांमध्ये मेट्रो स्थानकांवरील दोन प्रवाशांमधील अंतर, त्यांची तपासणी आणि गर्दी नियंत्रण यांचा समावेश आहे. त्याचबरोबर प्रवासादरम्यान दोघांमध्ये सुरक्षित अंतर राहावं यासाठी कोणत्या सीट राखीव असतील याची स्टिकर द्वारा माहिती दिली गेली आहे. मुंबई मेट्रो वनच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.

mumbai metro putting stickers on the seats to maintain physical distancing


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai metro putting stickers on the seats to maintain physical distancing