मेट्रोचे 11 मार्ग 2024 पर्यंत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

मुंबईतील 11 मेट्रो मार्गांचे संपूर्ण जाळे 2024 च्या अखेरीस पूर्ण होईल, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मार्च 2019 मधील प्रगती अहवालात स्पष्ट केले आहे. मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 या मार्गांची चाचणी 2020 मध्ये होईल, असेही नमूद करण्यात आले आहे.

मुंबई - मुंबईतील 11 मेट्रो मार्गांचे संपूर्ण जाळे 2024 च्या अखेरीस पूर्ण होईल, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मार्च 2019 मधील प्रगती अहवालात स्पष्ट केले आहे. मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 या मार्गांची चाचणी 2020 मध्ये होईल, असेही नमूद करण्यात आले आहे.

सर्व मेट्रो मार्ग पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर दररोज 70 लाख प्रवाशांना लाभ होईल, असा विश्‍वास "एमएमआरडीए'ने व्यक्त केला आहे. मेट्रो मार्ग उपनगरी रेल्वेस्थानकांना जोडल्यामुळे मुंबईसोबत ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार आदी शहरे जोडली जात आहेत. या जोडणीतील मेट्रो 2 बी, मेट्रो 4 व मेट्रो 6 या मार्गांची चाचणी डिसेंबर 2021 मध्ये होईल. मेट्रो 10 व मेट्रो 11 या प्रकल्पांना एमएमआरडीएची मान्यता मिळाली असून, या वर्षअखेरीपर्यंत कामाला सुरवात होईल.

Web Title: Mumbai Metro Route