मुंबई मेट्रो अपडेट : मेट्रो-3 च्या भुयारीकरणाचा 35 वा टप्पा पूर्ण

मुंबई मेट्रो अपडेट : मेट्रो-3 च्या भुयारीकरणाचा 35 वा टप्पा पूर्ण

मुंबई, ता. 17 : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो-3 मार्गिकेवरील सिद्धिविनायक ते दादर हा 1.12 किमी इतका लांब 25वा भुयारीकरणाचा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. या भुयारीकरणासह पॅकेज-4चे एकूण 10.96 किलोमीटर लांबीचे भुयारीकरण बुधवारी (ता.16) पूर्ण झाले आहे. यासाठी 3 टीबीएम मशिन्स कार्यरत होत्या. 

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे मेट्रो 3 चे काम सुरू आहे. या प्रकल्पातील एकूण 7 पैकी 4 पॅकेजेसमध्ये भुयारीकरण 100 टक्के पूर्ण झाले आहे. पॅकेज-4 मध्ये भुयारीकरण करणे एक आव्हानात्मक काम होते. कारण या पॅकेजमधील सर्व विकासकामे रस्त्यावरील वाहतूक, धार्मिक स्थळांच्या जवळपास आहेत. शहराचे मुख्य केंद्र मानले जाणारे दादर, मेट्रो-3 द्वारे जोडले जाईल व मुंबईकरांच्या प्रवाश्यांच्या अडचणी कमी होतील,असे मुंमेरेकॉचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल म्हणाले.

हेरेन्कटनेट कंपनीद्वारे बनलेले व अर्थ प्रेशर बॅलेन्स (ई.पी.बी) तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) कृष्णा-1 द्वारे हे भुयारीकरण पूर्ण करण्यात आले. 7 जुलै रोजी या टप्प्याचे काम सुरू करण्यात आले होते. 805 रिंग्सचा वापर करून डाऊनलाइनचे काम पूर्ण करण्यात आले. दादर मेट्रो स्थानाकाचे जवळपास 42 टक्के काम पूर्ण झाले आहे, असे प्रकल्प संचालक एस. के. गुप्ता यांनी सांगितले.

पॅकेज 4 मध्ये दादर, सिद्धिविनायक, शीतलादेवी या स्थानकांचा समावेश असून येथे 8 भुयारीकरणाचे टप्पे पूर्ण करण्यात आले आहेत. त्यांचे तपशील पुढील प्रमाणे आहेत.

नयानगर ते धारावी (अपलाईन – 589 मी आणि डाउनलाईन – 589 मी), ते दादर (अपलाईन – 2491 मी आणि डाउनलाईन - 2472 मी), सिद्धिविनायक ते दादर (अपलाईन - 1106 मी आणि डाउनलाईन – 1126 मी), सिद्धिविनायक ते वरळी (अपलाईन - 1305  मी आणि डाउनलाईन - 1284 मी).

( संपादन - सुमित बागुल )

mumbai metro updates 35th stage of metro three underground work completed

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com