कोरोना रुग्णांसाठी मुंबई मेट्रोनं घेतला पुढाकार; करणार 'हे' कौतुकास्पद काम

mumbai metro
mumbai metro

मुंबई: मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा आहे तब्बल २८ हजारांच्या पुढे वर गेला आहे. त्यामुळे मुंबईत परिस्थिती अतिशय चिंताजनक होत चालली आहे. आता मुंबईतल्या काही रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी खाटा उपलब्ध नाहीयेत. तर विलगीकरण कक्षातहे जागा पुरत नाहीय. मात्र आता मुंबईतल्या कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी मुंबई मेट्रोनं पुढाकार घेतला आहे. 

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन द्वारे (एमएमआरसीएल) मुंबईत दोन कोविड कक्षाची उभारणी करण्यात येत आहे. यापैकी एक दहीसर चेक नाका परिसरात ८०० खाटांचे अलगिकरण कक्ष उभारण्यात आहे. तसंच २०० ऑक्सिजनेटेड खाटा देखील उपलब्ध असणार आहेत. 

 दुसरे केंद्र कंदर पाडा, बोरीवली आरटीओजवळ २५० खाटांचे असणार आहे. यात डायलिसिस केंद्राची सुविधा असणार आहे  सुविधा असणार आहे. कोरोनाचे मुंबईतील वाढते रुग्ण लक्षात घेऊन बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स ( बीकेसी) मध्ये एमएमआरडीएने १,००८ खाटांचे रुग्णालय गेल्या आठवड्यात उभारल्यानंतर त्याच्याच शेजारी ९५० खाटांची व्यवस्था असलेले अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याचे काम वेगाने सुरु आहे.

 रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबई मेट्रोकडून दोन कोविड कक्ष उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये १२५० खाटांमध्ये अलगीकरण कक्ष आणि डायलिसिस केंद्रचा समावेश असणार आहे. या दोन्ही कक्षाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यामुळे  दोन आठवड्याच्या आत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे असे मुंबई मेट्रो कडून सांगण्यात आले आहे.

mumbai metro will build quarantine centres and hospitals in mumbai read full story  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com