ऐतिहासिक मिनारा मस्जिद अनधिकृत बांधकामाच्या विळख्यातून मुक्त

दिनेश चिलप मराठे
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

मुंबईः दक्षिण मुंबईतील मुस्लिम बहुल विभागातील मेमनवाडा मार्ग, पायधुनी येथील जगप्रसिध्द मिनारा मस्जिद या धार्मिक स्थळाला लगत असलेल्या रस्त्यांवर गेली अनेक वर्षे अनधिकृतपणे ठाण मांडूण बसलेल्या विविध व्यावसायिकांच्या अनधिकृत पक्क्या बांधकामावर निष्कासनाची कार्यवाही सहाय्यक आयुक्त डॉ. उदयकुमार शिरुरकर यांच्या पथकाने केली.

मुंबईः दक्षिण मुंबईतील मुस्लिम बहुल विभागातील मेमनवाडा मार्ग, पायधुनी येथील जगप्रसिध्द मिनारा मस्जिद या धार्मिक स्थळाला लगत असलेल्या रस्त्यांवर गेली अनेक वर्षे अनधिकृतपणे ठाण मांडूण बसलेल्या विविध व्यावसायिकांच्या अनधिकृत पक्क्या बांधकामावर निष्कासनाची कार्यवाही सहाय्यक आयुक्त डॉ. उदयकुमार शिरुरकर यांच्या पथकाने केली. त्या वेळी त्यांच्या सोबत सहाय्यक अभियंता अतुल कोल्हे व चंद्रकांत सुर्यवंशी, किरण धस, वरिष्ठ निरीक्षक (अनुज्ञापन) विलास पवार, वरिष्ठ निरीक्षक (अतिक्रमण निर्मूलन)जगदीश केंगळे यांच्या उपस्थितीत तसेच 15 कामगार, 1 जेसीबी, 2 अतिक्रमण गाड्या यांच्या साह्याने सदर कार्यवाही करुन 25 ते 30 पक्के अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले आणि मेमनवाडा मार्ग अतिक्रमणमुक्त करण्यात आला.

बुधवारी (ता. 24) पायधुनी क्षेत्रातील मेमनवाडा मार्ग येथील एका इमारतीत सकाळी 6.00 वाजता आग लागल्याची घटना घडली असता सदर अनधिकृत पक्क्या बांधकामामुळे अग्निशमक दलाच्या बंबांना आग आटोक्यात आणण्याकरीता सदर रस्त्यावर जाण्यास अडचण झाली होती. त्यामुळे सदर बंब त्या ठिकाणी 15 ते 20 मिनीटे अडकून पडल्याचे डॉ. शिरुरकर यांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे, सदर आग लागल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जिवीत व वित्त हानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. सदर अग्निशमक बंबांना आग लागलेल्या ठिकाणी वेळेत पोहचता यावे याकरीता डॉ. उदयकुमार शिरुरकर यांनी कामगारांच्या मदतीने काही अनधिकृत बांधकाम हटविली व अग्निशमक बंब आगीच्या ठिकाणी पोहचून काही वेळात तेथील आग आटोक्यात आणण्यास मदत झाली.

सदर मार्गावर आग विझविण्याची कार्यवाही झाल्यावर मेमनवाडा मार्ग या मार्गाचे निरीक्षण केले असता असे दिसून आले की, त्या रस्त्यावर बहुतेक व्यावसायिकांनी अनधिकृत पक्के बांधकाम करुन रस्ता अतिक्रमित केला होता व त्यामुळे अग्निशमक बंबाच्या गाड्या, रुग्णवाहिका, महापालिकेच्या गाड्या व पोलिसांचे वाहने यांना दैनंदिन कार्य करण्यास अडचण निर्माण होण्याची शक्यता लक्ष्यात घेता सदर अनधिकृत बांधकामे तोडणे आवश्यक आहे ,असे सहा. आयुक्त बी विभाग यांना दिसून आले.

त्या अनुषंगाने डॉ. शिरूरकर यांनी पुढाकार घेऊन सदर मार्गावरील सर्व अनधिकृत बांधकाम व्यावसायिकांना तात्काळ अतिक्रमणे हटविण्याचे सुचित केले व त्यानुसार त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन त्वरित त्यांचे माल व साहित्य रिकामे करण्यास सुरुवात केली. त्यानंतर 1 जेसीबी व 25 कामगार यांच्या साह्याने अनधिकृत 25 ते 30 दुकाने निष्कासित करुन 6 गॅस सिलेंडर जप्त केलीत. सदर कार्यवाहीमुळे जगप्रसिध्द मीनारा मस्जिद अतिक्रमणमुक्त होवून त्याचे सौंदर्य पुन्हा खुलले तसेच, मेमनवाडा मार्ग मोकळा झाल्याने स्थानिक रहिवाश्यांनी आभार मानले.

Web Title: mumbai minara masjid area action on nauthorized construction