Mumbai Crime News: गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार; दोघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

woman crime

Mumbai Crime News: गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार; दोघांना अटक

Mumbai News - सतरा वर्षीय मुलीला पळवून पालघर येथे नेऊन तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी तक्रार वांद्रे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी दोन आरोपींविरोधात बलात्कार, विनयभंगासह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. आरोपीने मुलीवर केलेल्या अत्याचाराचे चित्रीकरणही केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी वांद्रे पोलीस अधिक तपास करत आहेत.

तक्रारीनुसार आरोपींनी वांद्रे पश्चिम येथून पीडित मुलीला जबरदस्तीने गाडीत बसवून गुंगी येण्यासाठी एक गोळी दिली. मुलीला गुंगी येऊ लागल्यानंतर आरोपींनी तिला पालघर येथील एका घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

पीडित मुलीने शुद्धीवर आल्यानंतर आरोपीला जाब विचारला असता आरोपीने त्याचा साथीदाराला पुन्हा तिच्यावर अत्याचार करण्यास सांगितले व त्याचे चित्रीकरण केले.

तसेच संबंधीत प्रकार कोणाला सांगितल्यास आईला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर शनिवारी आरोपी पीडित मुलीच्या आजारी असलेल्या आईला रुग्णालयात पाहण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याने बटवा विसरल्याचा बहाणा करून पीडित मुलीला बोलावून घेतले.

तसेच मारहाण करून तिच्यासोबत येण्यास जबरदस्ती केली. कंटाळून पिडीत मुलीने याप्रकरणी वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात वांद्रे पोलिसांना यश आले आहे.