मुंबईच्या MMR क्षेत्रात कोविडच्या सक्रिय रुग्णांच्या संख्येत ५० टक्के घट

corona
coronasakal media

मुंबई : मुंबईसह (Mumbai) एमएमआर क्षेत्रातील (MMR region) ठाणे जिल्हा, पालघर आणि रायगडमधील कोरोनातुन बरे(Corona free patient) झालेल्या रुग्णांची संख्या पाहता इथली परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे चित्र आहे. मुंबईत कोरोनातुन बरे झालेल्या रुग्णांची संख्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांपेक्षा (Active patients) जास्त आहे. केवळ एका महिन्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 50 टक्क्यांनी कमी झाली आहे. एमएमआर प्रदेशात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबई, केडीएमसी, मीरा-भाईंदर, भिवंडी, उल्हासनगर, वसई-विरार, पनवेल या भागांचा समावेश आहे. या भागातही कोरोना रुग्णांची संख्या (decreasing corona) सातत्याने कमी होत आहे. (Mumbai-mmr region-Corona free patient-Active patients-decreasing corona-nss91)

एका महिन्यापूर्वी 29 जून रोजी राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या दैनंदिन कोरोना अहवालावर नजर टाकली तर मुंबईत 500 पेक्षा जास्त, पनवेलमध्ये 100 पेक्षा जास्त, पालघरमध्ये 100 पेक्षा जास्त, नवी मुंबईत 100 पेक्षा जास्त इत्यादी भागातील 50 पेक्षा अधिक  एमएमआर प्रदेशात दररोज 1700 पेक्षा जास्त नवीन कोरोना रुग्ण आढळले होते. परंतु, एका महिन्यानंतर ही संख्या 1000 वर आली आहे.

corona
राज कुंद्राच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने निकाल ठेवला राखून

कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात घट होण्याबरोबरच कोरोनामधून बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. एक महिन्यापूर्वी 29 जून रोजी एमएमआर प्रदेशात कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 15,27,608 होती, जी 29 जुलै रोजी एका महिन्यानंतर 15,87,807 झाली.  आकडेवारीचे आकलन केले तर एका महिन्यात कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येत 5 टक्के वाढ दिसून आली आहे. बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने, सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.

एका महिन्यापूर्वी, एमएमआर प्रदेशात सक्रिय रुग्णांची संख्या 31209 होती, जी 29 जुलै रोजी 15418 वर आली आहे, म्हणजेच 50 टक्के घट झाली आहे. राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले यांनी सांगितले की , कडक निर्बंध आणि कोरोना नियमांचे पालन केल्यामुळे एमएमआर प्रदेशातही कोरोना नियंत्रणात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com