MNS Gudi Padwa Campaign : चला शिवतीर्थावर म्हणत हजारो मनसैनिक मुंबईला रवाना

मनसेचा गुढी पाडवा मेळावा काही तासात पार पडणार आहे. मनसेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात सगळं बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला होता.
MNS activists
MNS activistssakal
Summary

मनसेचा गुढी पाडवा मेळावा काही तासात पार पडणार आहे. मनसेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात सगळं बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला होता.

डोंबिवली - मनसेचा गुढी पाडवा मेळावा काही तासात पार पडणार आहे. मनसेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात सगळं बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला होता. यामुळे पाडवा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. या मेळाव्यासाठी कल्याण डोंबिवली परिसरातून तब्बल 200 बस मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या.

डोंबिवलीतील नववर्ष स्वागत यात्रेला सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती नागरिकांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारुन गेली. यानंतर आता मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आजच मनसेचा गुढी पाडवा मेळावा देखील होणार आहे.

MNS activists
Lodha Palava : डोंबिवलीतील लोढा पलावातील इमारतींना तडे ; आव्हाड म्हणतात, मराठी माणसाला हे परत...

या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरून भाषण करणार आहेत. या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान या भाषणाबद्दलची उत्सुकचा शिगेला पोहचली असतानाच कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांच्या पुढाकाराने कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आदी भागातून हजारो मनसैनिक मुंबईला रवाना झाल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com