Thur, Sept 21, 2023

Mumbai : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाणे जिल्हाच्या दौऱ्यावरती; मनसेच्या 'त्या' बॅनरची चर्चा..
Published on : 14 May 2023, 6:41 am
कल्याण - मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बदलापूर अंबरनाथ उल्हासनगर च्या दौऱ्यावरती आहेत. आज बदलापुर, अंबरनाथ, उल्हासनगर येथे मनसे पदाधिकारी यांच्या बैठका घेऊन पक्षाच्या कामाचा आढावा घेणार आहेत.
दरम्यान या चारही शहरांमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार बॅनर बाजी केली असून डोंबिवली आणि अंबरनाथ मधील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बॅनरची चर्चा आता रंगू लागली आहे. मनसेच्या बॅनर वरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना हिंदूधर्माभिमानी असा उल्लेख केला आहे.
त्यामुळे या बॅनरची चर्चा आता सर्व ठिकाणी होऊ लागली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे काल रात्री अंबरनाथ मध्ये वास्तव्याला होते, तर आज रात्री वास्तव्यला असतील.