मुंबई पालिकेच्या जाहिरातीत त्रुटी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 डिसेंबर 2016

मुंबई - राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) मुंबई महापालिकेच्या सहायक आयुक्त पदासाठी काढलेली जाहिरात अपूर्ण असून, त्यात बऱ्याच त्रुटी आहेत.

त्यामुळे "एमपीएससी'ने शुद्धिपत्रक काढावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली आहे. जाहिरातीत ही परीक्षा नेमकी कधी होणार आहे, याचा तपशील नाही. मागासवर्गीय उमेदवारांना हा अर्ज भरताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे "एमपीएससी'ने याप्रकरणी शुद्धिपत्रक काढावे, असे मनविसेचे उपाध्यक्ष संतोष गांगुर्डे आणि संतोष धोत्रे यांनी आयोगाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला अर्ज करताना अधिवास प्रमाणपत्राची (डोमिसाईल) सक्ती नाही. त्यामुळे या जागेसाठी परप्रांतीय मोठ्या प्रमाणात अर्ज करण्याची शक्‍यता नाकारता येत नाही, याकडेही मनविसेने लक्ष वेधले आहे. खुल्या प्रवर्गात अर्ज करणाऱ्या मागासवर्गीय उमेदवाराला संविधानात्मक हक्क मिळणार नसल्याचे जाहिरातीवरून दिसते. याबाबत आक्षेप नोंदविल्यामुळे मनविसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत एमपीएससीच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेतली. याप्रकरणी योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे लेखी आश्‍वासन सचिव प्रदीप कुमार यांनी दिले आहे.

Web Title: mumbai municipal advertise problem