Mumbai : राज्य सरकारडे कोरोना उपाययोजनेसाठी ३९०० कोटीची पालिकेची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bombay municipal corporation

Mumbai : राज्य सरकारडे कोरोना उपाययोजनेसाठी ३९०० कोटीची पालिकेची मागणी

मुंबई - मुंबईतील कोरोनाच्या तीन लाटा मुंबई महापालिकेच्या आरोग्या खात्याने थोपविल्या. कोरोना नियंत्रणासाठी पालिकेने आपल्या निधीतून खर्च केला. खर्च केलेला हा निधी पालिकेला मिळावा, यासाठी पालिकेने राज्यसरकारकडे पाठपुरावा चालविला आहे. उपजिल्हाधिकारी शहर आणि उपगनर यांच्याकडे सुमारे ३ हजार ९०० कोटी रुपयांची मागणी पालिकेने केली आहे.

मुंबईत कोरोना पुन्हा डोके वर काढत आहेत. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने आपल्या निधीतून खर्च केला. सद्या मुंबईतील रुग्णांची संख्या १ हजार २३ इतकी झाली आहे. रुग्णसंख्या वाढू लागली आहे.

पालिकेच्या आरोग्य खात्याने कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात रहावी, संख्या वाढू नये यासाठी प्रभावी उपायोजना केल्या आहेत. यापूर्वी पालिकेने खर्च केलेल्या निधीची राज्य सरकारकडे मागणी केली आहे. सद्या कोरोनाच्या रुग्णांची आणि मृतांची संख्या नियंत्रणात असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी सांगितले.

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून पालिकेने स्वताच्या निधीतून कोरोना नियंत्रणात येईपर्यंत खर्च केला. हा खर्च सुमारे ३ हजार ९०० कोटी रुपये इतका आहे. या खर्चापैकी जिल्हाधिकारी मुंबई शहर यांनी ११४१.९४ कोटी रुपये द्यावेत आणि जिल्हाधिकारी उपनगर यांनी ११५८.११ कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी मुंबई महानगर पालिकेने केली आहे. राज्य सरकारकडे त्याबाबत पालिकेचा पाठपुरावा सुरू असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. भविष्यात कोरोना आणखी वाढल्यास त्याला प्रतिबंध करण्यासाठी निधीची गरज भासणार आहे. राज्य सरकारकडून हा निधी मिळाल्यास पालिकेलाही कोरोना नियंत्रणासाठी उपायोजना करता येतील. यंत्रसामुग्री खरेदी करता येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Mumbai NewsCoronavirusBMC