मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेची इच्छा युतीची

मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेची इच्छा युतीची

मुंबई - मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एकत्रितपणे मतदारांना सामोरे जाणे आवश्‍यक असल्याने शिवसेनेने सध्या साहचर्यपर्व अंमलात आणले आहे. विधिमंडळात सत्तारूढ भाजपला गेल्या आठवड्यात शिवसेनेने प्रत्येक बाबतीत मदत केली असल्याचे सांगण्यात येते. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार हे निश्‍चित असल्याने त्यांना दुखवायचे नाही हा सेनेने स्वीकारलेला दृष्टिकोन असल्याचे समजते.

मुंबई महापालिकेत सतत सत्तेत असल्याने सेनेला "ऍन्टी इन्कम्बन्सी'चा शाप सहन करावा लागेल, असे काही महत्त्वाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. जनतेची नाराजी दूर ठेवायची असेल तर भाजपसमवेत गेलेले बरे, असे बहुतांश नेत्यांचे मत आहे. भाजपने गेल्या काही दिवसांत चालवलेली तयारी लक्षात घेता मुंबईत या पक्षाला ताकद दाखवायची असल्याचे स्पष्ट दिसते आहे. अशा परिस्थितीत एकेकाळच्या सहकारी पक्षाला अडचणीत आणणे बरोबर नाही, असे मत सेनेतील काही कार्यकर्ते व्यक्‍त करीत आहेत. त्यातच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे परस्परांशी संबंध उत्तम असल्याने या अधिवेशनात शिवसेनेने विरोधाचा एकही स्वर व्यक्‍त केलेला नाही.

नोटाबंदीसंबंधातील सेनेच्या वेगळ्या मतामुळे दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या भेटीला गेलेल्या शिष्टमंडळात सेना सहभागी होईल काय, अशी शंका व्यक्‍त केली जात होती; मात्र प्रत्यक्षात सेनेने या शिष्टमंडळात ज्येष्ठ नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा समावेश केला. महापालिका युतीची चर्चा होईपर्यंत भाजपला दुखवायचे नाही, असा सेनेचा सध्याचा सूर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com