स्थायी समितीत ‘खड्डा’जंगी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 डिसेंबर 2018

मुंबई - रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामात कोल्डमिक्‍ससाठी महापालिका प्रशासन आणि हॉटमिक्‍ससाठी स्थायी समितीचे सदस्य आग्रही आहेत. तंत्रज्ञानावरून वाद सुरू असताना रस्त्यांची मात्र दुरवस्था झाली आहे. रस्तेदुरुस्तीच्या विषयावरून स्थायी समितीत शुक्रवारी (ता. ३०) जोरदार ‘खड्डा’जंगी झाली. खड्डे बुजवण्यात प्रशासनाला अपयश आल्याने रस्त्यांचे तीनतेरा झाले आहेत, असा हल्लाबोल सदस्यांनी केला.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

महापालिका प्रशासनाने शुक्रवारी हॉटमिक्‍सच्या वापराबाबत स्थायी समितीच्या बैठकीत निवेदन केले. त्यावरून हॉटमिक्‍स विरुद्ध कोल्डमिक्‍स असा वाद उफाळला. पावसाळ्यात खड्ड्यांची चाळण झाली होती. पावसाळ्यानंतर त्यांची दुरुस्ती करण्याचे आश्‍वासन प्रशासनाने दिले होते; परंतु खड्डे बुजवण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. त्यावरून स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनविरुद्ध सत्ताधारी आणि विरोधक असा सामना रंगला. 

रस्त्यांवर पडलेले खड्डे अजूनही बुजवण्यात आलेले नाहीत. प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात कोल्डमिक्‍स तंत्रज्ञान  निरुपयोगी ठरले आहे. कोल्डमिक्‍सच्या पिशव्या पडून असतानाही प्रशासन या तंत्रज्ञानाचा आग्रह का धरत आहे, असा सवाल विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला.

मुंबईतील रस्ते आजही खड्डेमय आहेत. खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याला जबाबदार कोण, असा प्रश्‍न सपचे सदस्य रईस शेख यांनी विचारला. शिवसेना आणि अन्य सर्व पक्षांच्या सदस्यांनी हॉटमिक्‍सचा आग्रह धरला, तर प्रशासन कोल्डमिक्‍ससाठी आग्रही होते. त्यामुळे प्रशासनाविरोधात सर्व राजकीय पक्षांचे सदस्य एकवटले.

प्रतिक्रिया
रस्त्यांवरील खड्डे ९० टक्के बुजवल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला असला तरी खड्डे कायम आहेत. कोल्डमिक्‍सने खड्डे बुजवले जात नाहीत. हे तंत्रज्ञान निरुपयोगी ठरल्याची सर्वच सदस्यांची भावना आहे. त्यामुळे हॉटमिक्‍सचा वापर करून खड्डे बुजवावेत.
- यशवंत जाधव, अध्यक्ष, स्थायी समिती

Web Title: mumbai municipal corporation Standing Committee