नावीन्यपूर्ण उपक्रमांत मुंबई पालिका अव्वल! 

नावीन्यपूर्ण उपक्रमांत मुंबई पालिका अव्वल! 

मुंबई - केंद्र सरकारच्या वतीने संपूर्ण देशभरातील शहरे आणि महानगरांचे स्वच्छता अभियानांतर्गत नुकतेच सर्वेक्षण झाले होते. यात "सर्वोत्कृष्ट आणि नावीण्यपूर्ण उपक्रम' राबवणाऱ्या राजधान्यांच्या श्रेणीत मुंबई अव्वल ठरली आहे. केंद्र सरकारचा "बेस्ट कॅपिटल सिटी इन इनोव्हेशन ऍण्ड बेस्ट प्रॅक्‍टिसेस' हा पुरस्कार मुंबई महापालिकेला मिळाला आहे. 

नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे बुधवारी (ता. 6) झालेल्या एका विशेष समारंभात केंद्रीय नगरविकास सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्या हस्ते पालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त विजय सिंघल आणि उपायुक्त विश्‍वास शंकरवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. वांद्रे पश्‍चिम विभागात स्थानिक नागरिकांच्या मदतीने एक मेट्रिक टन कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणारा प्रकल्प, मरिन ड्राईव्ह येथील अद्ययावत शौचालय आणि इतर नावीण्यपूर्ण उपक्रमांसाठी हा सन्मान देण्यात आला आहे. स्वच्छता अभियानाच्या अनुषंगाने जनजागृती, घनकचऱ्याचे सुयोग्य व्यवस्थापन, कचऱ्याचे प्रमाण कमी करणे यांसारख्या योजना राबवण्यात आल्या आहेत. 

मुंबईतून दररोज 9,500 मेट्रिक टन कचरा 2015 मध्ये जमा होत होता. पालिकेने राबवलेल्या उपाययोजनांमुळे कचऱ्याचे 2,300 मेट्रिक टनाने कमी झाले आहे. कचरा वर्गीकरण, कचऱ्यापासून खतनिर्मिती, जनजागृती, प्रदर्शने यांसारख्या उपाययोजनांचा यात समावेश आहे. उद्याने, इमारती, रुग्णालये, कार्यालये आदी ठिकाणी ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करणारे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. 

खतनिर्मितीमुळे कचरा कमी 
20 हजार चौरस मीटरपेक्षा अधिक आकाराचा भूखंड असणाऱ्या सोसायट्या किंवा दररोज 100 किलोपेक्षा अधिक कचरा तयार होतो, अशा सोसायट्या, रेस्टॉरंट किंवा मॉल आदींना त्यांच्या स्तरावर कचऱ्यापासून खतनिर्मिती करणारे प्रकल्प उभारणे बंधनकारक करण्यात आले. याचाही सकारात्मक परिणाम कचरा कमी होण्यावर झाल्याचा दावा पालिकेने केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com