...तर मुंबई महानगरपालिका निवडणुकांवर बहिष्कार टाकणार!

प्रदुषणकर्त्या प्रकल्पाविरोधात गोवंडीतील नागरिकांना एल्गार
Mumbai Municipal Corporation will boycott elections protest of citizens of Govandi against polluting project
Mumbai Municipal Corporation will boycott elections protest of citizens of Govandi against polluting project sakal

मुंबई : मुंबईतील सार्वजनिक आणि खासगी हॉस्पिटलमधील बायोमेडिकल कचरा नष्ट करणाऱ्या कंपनीविरोधांत गोवंडीतील नागरिकांना बंडाचा पवित्रा घेतला आहे. या कंपनीमुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात प्रदुषणाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या कंपनीकडून होणारे प्रदुषण थांबले नाही, तर आम्ही आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकू असा निर्णय गोवंडीतील स्थानिकांनी घेतला आहे. गोवंडीतील नागरिकांना या कंपनीच्या प्रदूषणामुळे भेडसावणाऱ्या आरोग्याच्या समस्या पाहता नागरिकांनी आता कंपनीविरोधात कायदेशीर लढाई करण्याचाही निर्णय घेतला आहे.

मुंबईतील सर्व हॉस्पिटलमधून बायोमेडिकल कचरा गोवंडी येथे एसएमएस कंपनीकडे नष्ट करण्याच्या प्रक्रियेसाठी येत असतो. दिवसापोटी ८ टन ते १० टन इतक्या मोठ्या प्रमाणात बायोमेडिकल कचऱ्यावर याठिकाणी प्रक्रिया होत असते. याठिकाणी १२ लाख इतक्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या ही झोपडपट्टीमध्ये राहणारा बहुतांश असा मजूर आणि त्यांचे कुटुंबीय असा वर्ग आहे. केंद्रीय पर्यावरण नियामक मंडळाच्या मार्गदर्शकांनुसार बायो मेडिकल वेस्ट ट्रिटमेंट करणारा प्रकल्प हा रहिवासी वस्तीपासून दूर असावा, असे निर्देश आहेत. त्यामुळे या प्रकल्पाचा परिणाम हा कमी होईल. सध्या गोवंडी बैंगनवाडी परिसरात असणाऱ्या या प्रकल्पामुळे १२ लाख रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची तक्रार गोवंडीतील नागरिकांची आहे. त्यामुळे जोवर ही कंपनी बंद किंवा शिफ्ट होत नाही, तोपर्यंत आमच्यापैकी येत्या २०२२ च्या महापालिका निवडणुकीत कोणीही मतदान करणार नाही. आम्ही सर्व जण मिळून मतदानावर बहिष्कार टाकू अशी मोहीम गोवंडी न्यू संगम वेल्फेअर सोसायटीने हाती घेतली आहे.

आम्हाला दैनंदिन होणाऱ्या त्रासामुळेच आम्ही गोवंडी तसेच मानखुर्दवासीयांचा मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाला या प्रदुषणाने होणाऱ्या त्रासाबाबतची तक्रार केली आहे. केंद्रीय हरित लवादाकडेही गोवंडीकरांनी तक्रार दाखल केली आहे. याठिकाणी प्रमाणापेक्षाही काळा धूर हा मानवी जीवनासाठी अतिशय धोकादायक असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. त्यामुळेच या चिमणीतून सोडण्यात येणाऱ्या धुराचे डिजिटल मॉनिटरींग करण्याची मागणी आम्ही केली होती. तसेच खालापूर येथे २०२१ मध्ये हा प्रकल्प हलवण्यासाठीचे आश्वासन देण्यात आले होते. पण त्याची कोणतीच पूर्तता झाली नाही अशी प्रतिक्रिया गोवंडी येथील स्थानिक कार्यकर्ते फयाज शेख यांनी दिली. यापुढेही महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रणाच्या माध्यमातून हा लढा तीव्र करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com