मुंबई मनपाने 281 मंडळांना परवानगी नाकारली 

मुंबई मनपाने 281 मंडळांना परवानगी नाकारली 

मुंबई - शहरात मंगलमूर्तीच्या आगमनाची लगबग सुरू असतानाच विविध तांत्रिक कारणांमुळे मुंबई महापालिकेने तब्बल 281 मंडळांना मंडपासाठीची परवानगी नाकारली. त्यामुळे ऐन उत्सवात परवानगी नाकारलेल्या मंडपांच्या परवानगीचा वाद चिघळला आहे. 

गणेशोत्सवासाठीच्या मंडपासाठी पालिकेकडे यंदा 3499 अर्ज आले; मात्र पालिकेने या वर्षीपासून सुरू केलेल्या ऑनलाईन परवानगीच्या घोळामुळेच अनेक मंडळांना अर्ज करताना तांत्रिक अडचणी आल्या, असा आरोप गणेशोत्सव समितीने केला आहे. दरम्यान, विविध कागदपत्रांची पूर्तता झाली नसल्यामुळे 281 मंडळांना मंडप परवानगी नाकारली असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. तसेच यामध्ये दोन वेळा अर्ज करण्यात आलेले 759 अर्जही नाकारण्यात आले, तर आतापर्यंत 2740 मंडळांना मंडपासाठी परवानगी देण्यात आली आहे. शास्त्रीनगर टॅक्‍सी स्टॅंड गणेशोत्सव मंडळ, विघ्नहर्ता मित्र मंडळ, शीतलादेवी मंदिर सेवा मंडळ, न्यू यूथ क्‍लब गणेशोत्सव मंडळ या पूर्व आणि पश्‍चिम उपनगरातील मंडळांच्या मंडपांविरुद्धही कारवाई झाली आहे, तसेच या कारवाईत एका मंडपाचा आकारही कमी करण्यात आला आहे. 281 मंडपांना परवानग्या नाकारल्यामुळे तसेच बेकायदा मंडपांवर कारवाया सुरू केल्यामुळे आता ऐन उत्सवात नव्या वादाला तोंड फुटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com