तापलेल्या मुंबईत प्रचाराचाही भडका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 फेब्रुवारी 2017

मतदारराजाच्या भेटीसाठी उमेदवारांची पायपीट

मुंबई : सूर्य मुंबईला भाजून काढत असताना शनिवारी (ता. 18) निवडणूक प्रचाराचाही भडका उडाला होता. घामाच्या धारांनी निथळत उमेदवार आणि कार्यकर्ते भरदुपारीही मतदारराजाच्या दारी जात होते.

मतदारराजाच्या भेटीसाठी उमेदवारांची पायपीट

मुंबई : सूर्य मुंबईला भाजून काढत असताना शनिवारी (ता. 18) निवडणूक प्रचाराचाही भडका उडाला होता. घामाच्या धारांनी निथळत उमेदवार आणि कार्यकर्ते भरदुपारीही मतदारराजाच्या दारी जात होते.

मुंबईचा पारा आज 40 अंशांपर्यंत गेला होता. अशा तप्त वातावरणातही प्रचाराचा पारा चढला होता. जाहीर प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवार आणि कार्यकर्ते पाण्याच्या बाटल्या रिकाम्या करत प्रभागांमध्ये पायपीट करत होते. निवडणुकीच्या प्रचाराची सांगता रविवारी (ता. 19) संध्याकाळी होणार आहे. उद्या सर्व उमेदवार रोड शो करतील. सर्वच प्रमुख नेत्यांच्या आज सभा होत्या. दिवसभर प्रचार करून या सभांनाही कार्यकर्त्यांना जायचे होते. त्यामुळे सकाळपासूनच उमेदवार रस्त्यावर उतरले होते; मात्र सूर्य डोक्‍यावर येऊ लागला तसा पारा चढू लागला, उन्हाने मुंबई तापली; पण प्रचार काही थांबला नाही. प्रचार करणारे कार्यकर्ते पाण्याच्या बाटल्या रिकाम्या करत प्रचार करत होते. लिंबू सरबतवाल्यांचा धंदा तेजीत आला होता. उमेदवार आणि बिनीच्या शिलेदारांना "एनर्जी ड्रिंक' दिले जात होते; पण दुसऱ्या मिनिटाला त्यांची एनर्जी क्षीण होत होती. मतदारांच्या दारीही त्यांना आर्वजून पाणी दिले जात होते. ऊन तर खूप आहे; पण काय करणार? आजचा दिवस कारणी लावायचा आहे. प्रत्येक घरी जायचे आहे. चटके सहन करावेच लागणार, असे केल्याखेरीज गत्यंतर नाही, अशी प्रतिक्रिया उमेदवार नोंदवत होते.

Web Title: mumbai municipal election