मुंबई महापालिकेत 'अंडरस्टॅण्डिंग'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

46 मिनिटांत 1100 कोटींचे प्रस्ताव मंजूर
मुंबई - महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर स्थायी समितीत बुधवारी विक्रमी प्रस्तावांच्या मंजुरीचा "बंपर धमाका' झाला. सत्ताधारी आणि विरोधकांची अजब युती समितीच्या बैठकीत दिसली. सुमारे 1100 कोटींचे तब्बल 74 प्रस्ताव अवघ्या 46 मिनिटांत मंजूर झाले. सत्ताधारी आणि विरोधकांचे स्टॅण्डिंग कमिटीत "अंडरस्टॅण्डिंग' दिसले.

वॉर्डांतील विकासकामे निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी मार्गी लागावीत यासाठी सर्वच राजकीय पक्षांची धडपड सुरू आहे. आपल्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा नगरसेवकांना आता मतदारांपुढे मांडावा लागणार आहे. त्यासाठी अधिकाधिक कामे करून दाखवण्याची किंवा मार्गी लावण्याची चढाओढ सुरू झाली आहे. त्यामुळेच सरसकट मंजुरी देण्याची किमया घडली. विरोधी पक्ष सदस्यांनी सर्व प्रस्तावांना संमती दर्शवली.

मंजूर झालेले महत्त्वाचे प्रस्ताव
- शाळांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणीचा 73 कोटींचा प्रस्ताव
- पाणी गळती थांबवण्याचा 45 कोटींचा प्रस्ताव
- उड्डाणपुलांचे बांधकाम करण्यासाठी 400 कोटी
- जवळपास 1100 कोटींचे प्रस्ताव फक्त 46 मिनिटांत स्थायी समितीत मंजूर

Web Title: mumbai municipal understanding