मुंबईकरांनी मारला मटण-चिकनवर ताव!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 जानेवारी 2019

मुंबई - घरातील गृहिणी मार्गशीर्षचे उपवास धरते म्हणून नाईलाजास्तव महिनाभर तोंड बंद करून बसलेल्या मांसाहारींनी रविवारी मात्र चिकन-मटण आणि माशांवर यथेच्छ ताव मारला. महिनाभर कसाबसा शाकाहार गळी उतरवलेल्या मत्स्यप्रेमींनी सकाळीच मासळी बाजार गाठत ‘महागडे’ मासे खरेदी केले. खवय्यांचा भारी उत्साह चिकन आणि मटण विक्री करणाऱ्या दुकानांच्या बाहेरही दिसत होता. मुंबईतील अनेक हॉटेलच्या बाहेर मासे आणि चिकन खाण्यासाठी अन्‌ पार्सल नेण्यासाठी अनेकांनी चक्क रांगा लावल्या होत्या. 

श्रावणाप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्यातही सामिष पदार्थ अनेक जण वर्ज्य करतात. काहींच्या घरी जबरदस्तीने शाकाहारी खायला भाग पाडले जाते. अशा अघोषित बंदीमुळे नवीन वर्षाचे स्वागतही अनेकांना साधेपणाने करावे लागले. मार्गशीर्ष महिन्याची सांगता आणि रविवार असा योग जुळून आल्याने अनेकांनी घरी चिकन-मटणाचे बेत आखले होते. रविवारी मटण, चिकन व मासळीला खवय्यांकडून मोठी मागणी असणार याचा विक्रेत्यांनी आधीच अंदाज बांधला होता. त्यानुसार त्यांनीही रविवारसाठी जादा मालाची आवक केली होती. इतके दिवस ओस पडलेली मांसाहारी हॉटेल आज पुन्हा खवय्यांच्या येण्याने भरून गेली होती. चिकन करी, कोळंबी मसाला, सुरमई फ्राय, पापलेट फ्राय, चिकन बिर्याणी आदी खाद्यपदार्थांना आज चांगलाच भाव होता.

मांसाहारी हॉटेलबाहेर खवय्यांच्या रांगा
दादरमधील सचिन, गोमांतक, पूर्वा पंगत, मालवणी कट्टा आदी हॉटेलमध्ये खवय्यांची प्रचंड गर्दी झाली होती. गोमंतक आणि मालवणी कट्टामध्ये तर वेटिंगच्या रांगा लागल्या होत्या. लालबाग-परळमधील हॉटेलव खानावळींवर नॉनव्हेज खाणाऱ्यांची गर्दी झाली होती. 

Web Title: Mumbai Mutton Chicken