तीन हजार कोटींचे अमली पदार्थ जप्त; नौदलाची मुंबईत धडक कारवाई

नौदलाची गस्तीनौका 'सुवर्णा'वरील नौसैनिकांनी आवळल्या मुसक्या
Drugs-Seized
Drugs-SeizedE Sakal

मुंबई: भारतीय नौदलाची गस्तीनौका 'सुवर्णा'वरील नौसैनिकांनी सोमवारी अरबी समुद्रातील कारवाईत तीनशे किलो अमली पदार्थ जप्त केले. सुवर्णा ही नौका अरबी समुद्रात गस्त घालीत असताना संशयास्पद हालचाली करणारी एक मच्छिमारी बोट आढळून आली. अधिक तपासासाठी सुवर्णावरील नौसैनिक या मच्छिमारी बोटीवर गेले व त्यांनी तपास केल्यावर त्यांना तेथे हा अमली पदार्थांचा साठा सापडला. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे तीन हजार कोटी रुपये आहे. मच्छिमारी बोट व त्यावरील कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी केरळमधील कोची बंदरात नेण्यात आले.

तटरक्षक दलानेही अनेक वेळा अशा कारवाया करून हजारो कोटी रुपयांचे अमली पदार्थ तस्करांकडून जप्त केले होते. त्यापाठोपाठ आता नौदलानेही अशी कारवाई केल्याने या तस्करीला आळा बसेल असे बोलले जात आहे. अमली पदार्थांचा एवढा मोठा साठा जप्त झाल्याने पाकिस्तान-इराणपासून सुरु होणारे अमली पदार्थांचे रॅकेट नष्ट होण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्वपूर्ण मानली जात आहे. हे अमली पदार्थ भारतासह, मालदीव, श्रीलंका येथपर्यंत छोट्या मच्छिमारी बोटींमधून जातात. या अमली पदार्थांच्या रॅकेटमधून तरुण पिढीला नशेची सवय लावली जातेच, मात्र याच माध्यमातून अतिरेक्यांकडून शस्त्रांची वाहतूक व तस्करीदेखील होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com