‘केटी’वर पोलिसांची नजर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

कोपरखैरणे - गणेशोत्सवात मंडळांच्या मंडपात चालणाऱ्या ‘केटी’वर पोलिसांची करडी नजर असली, तरी त्यांना मंडळांचाच आशीर्वाद असल्याने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा जुगार चालतो. त्यामुळे याची कोणाला माहिती असल्यास त्यांनी ती द्यावी. त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

गणपती उत्सव म्हणजे जुगार असे समीकरण काही मंडळींच्या बाबतीत तयार झाले आहे. गणपतीच्या मंडपात जुगार सुरू असतात. परंतु अद्याप एकाही ठिकाणी पोलिसांनी कारवाई केलेली नाही. धार्मिक भावना दुखावू नयेत यासाठी पोलिस मवाळ भूमिका घेत असल्याने या मंडळींचे फावले आहे. यातील केटीच्या प्रकारात जुगार खेळताना कोण हरला आणि कोण जिंकला याच्याशी मंडळाला काहीच घेणे देणे नसते. जेवढ्या पैशांचा खेळ होईल त्यातील काही रक्कम मंडळाला दिली जाते. 

मंडळात चालणाऱ्या जुगारांवर पोलिसांची नजर आहे. साध्या वेशातील पोलिसांची गस्तही असते. असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. असे प्रकार कुठे सुरू असल्याचे कळले तर नागरिकांनी त्याची माहिती देऊन पोलिसांना सहकार्य करावे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल.
- डॉ. सुधाकर पाठारे उपायुक्त, परिमंडळ.

Web Title: mumbai new police