जगातील सर्वांत लठ्ठ महिलेसाठी दोन कोटींचे स्वतंत्र रुग्णालय 

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जानेवारी 2017

मुंबई : मुंबईमध्ये जगातील सर्वांत लठ्ठ महिलेसाठी चर्नी रस्त्यावरील सैफी रुग्णालयात विशेष व्यवस्था करणे सुरू आहे. हे सर्व सोपस्कार इजिप्शियन महिला इमान एहमद हिची स्थूलतत्वाची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. सैफी रुग्णालयाने चक्क एक स्वतंत्र रुग्णालय बांधायला सुरवात केली आहे.

मुंबई : मुंबईमध्ये जगातील सर्वांत लठ्ठ महिलेसाठी चर्नी रस्त्यावरील सैफी रुग्णालयात विशेष व्यवस्था करणे सुरू आहे. हे सर्व सोपस्कार इजिप्शियन महिला इमान एहमद हिची स्थूलतत्वाची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. सैफी रुग्णालयाने चक्क एक स्वतंत्र रुग्णालय बांधायला सुरवात केली आहे.

हे विशेष "वनबेड हॉस्पिटल' तयार करण्यासाठी तब्बल दोन कोटी खर्च केला जाणार आहे. इजिप्तमधील कौरोद येथे राहणारी इमान अहमद (बॅरिएट्रिक सर्जरी)स्थूलत्वाच्या शस्त्रक्रियेसाठी भारतात येणार आहे. त्यासाठी ही खास तयारी सुरू झाली आहे. इमानच्या वजनाचा अंदाज घेऊन तिला सोयीनुसार या हॉस्पिटलची रचना केली जात आहे. इमानसाठी 7 फूट बाय सात फूट अशा आकाराचा बेड तयार होत असून हा बेड खोलीतून आत जाईल इतके रुंद दरवाजे प्रत्येक खोलीला करण्यात येणार आहे. या वन बेड रुग्णालयात एक ऑपरेशन थिएटर, एक इन्टेन्सिव्ह केअर युनिट, डॉक्‍टरांची रुम 
अटेन्डंट रुम, दोन रेस्टरुम, एक व्हिडिओ कॉन्फरन्स रुम बांधण्यात येत आहे.

सैफी रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या तळमजल्यावर हे वन बेड रुग्णालयाचे काम सुरू आहे. सैफी रुग्णालयाचे स्थूलता तज्ज्ञ डॉ. मुफझ्झल लकडावाला, एक कार्डिऍक सर्जन,एक एन्डोक्रायनोलॉजीस्ट, एक चेस्ट फिजिशियन, दोन इम्टेन्सिव्हिस्टस, आणि तीन ऍन्स्थेटिस्ट इमान अहमद यांच्यावर शस्त्रक्रिया करणार आहेत. 

इमान अहमद ही 36 वर्षीय महिला आपल्या महाकाय आकारमानामुळे गेली 25 वर्षे आपल्या कैरो येथील घारातून ती बाहेर पडलेली नाही. मधुमेह, अस्थमा, हायपरटेन्शन, नैराश्‍य, फुफ्फुसांचे विकार आहेत. इमानला भारतात आणण्यासाठी मदत व्हावी यासाठी डॉ.लकडावाला यांनी तिच्या शाररिक स्थितीची माहिती देत ट्‌विटरवरून मदतीचे आवाहन केले आहे.

 
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज लकडावाला यांच्या ट्‌विटला सकारात्मक प्रतिसाद दिला. डॉ.लकडावाला यांची तिच्या शस्त्रक्रियेची निश्‍चित तारीख सांगितलेली नसून शस्त्रक्रियेची तयारी मात्र सुरू झाली आहे. ही शस्त्रक्रिया आणि पुढील सहा महिने उपचार मोफत केले जाणार आहेत. 

या वन बेड हॉस्पिटलची बांधणी 70 टक्के पूर्ण झाले असून पुढील दहा दिवसांत या रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आलेले असेल अशी माहिती त्या बांधकामाचे क्षेत्रव्यवस्थापक हरदिप सिंह यांनी दिली.  
 

Web Title: Mumbai: New Rs 2-crore ‘hospital’ for surgery of 500-kg Egyptian woman