अठरा हजारांहून अधिक तक्रारींचे निराकरण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

महावितरणची राज्यभरात संपर्क मोहीम
मुंबई - महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी राज्यभरातील ग्राहकांसाठी ग्राहक संपर्क मोहीम राबवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, 18 हजार 555 ग्राहकांच्या तक्रारी व अर्जांचे तत्काळ निराकरण करण्यात आले आहे.

महावितरणच्या राज्यभरातील 16 परिमंडळांमध्ये जुलै 2016 मध्ये ही मोहीम राबवण्यात आली. राज्यभरात 1 हजार 746 ग्राहक मेळावे घेण्यात आले. या मोहिमेत ग्राहकांसाठी नवीन वीजजोडणी, नावात बदल, वीजभार बदलणे यांसारख्या अर्जांवर कार्यवाही करण्यात आली. सदोष किंवा चुकीच्या बिलांची दुरुस्ती, सदोष किंवा जळालेले मीटर बदलण्यासह इतर तक्रारीही जागेवरच सोडवण्यात आल्या.

राज्यातून सुमारे 22 हजार 966 तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी 18 हजार 555 तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यात आले. उर्वरित 4 हजार 411 प्रलंबित तक्रारी निर्धारित मुदतीत सोडवण्यात येत असून, त्याची माहिती संबंधित ग्राहकांना देण्यात येत आहे. वारंवार चुकीचे रीडिंग घेणाऱ्या एजन्सींवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश संजीव कुमार यांनी दिले आहेत.

Web Title: mumbai news 18000 complaint resolved