दोन कोटींच्या हेरॉईनसह दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

मुंबई - अमली पदार्थविरोधी पथकाने (एएनसी) बुधवारी (ता. 1) शीव येथे केलेल्या कारवाईत दोन किलो 80 ग्रॅम हेरॉईनसह दोघांना अटक केली. या हेरॉईनची किंमत दोन कोटी आठ लाख असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गौतमसिंग ओमकारसिंग (वय 55) व बंटी अली कुदरत अली (23) अशी अटक आरोपींची नावे आहेत. ते राजस्थान येथील झलवाड जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

शीव पूर्व येथील चिदंबरम रस्त्यावरील वेल्फेअर व्हिलाच्या समोरील फुटपाथवर काही संशयित अमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती एएनसीच्या वरळी कक्षाला मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक निनाद सावंत व त्यांच्या पथकाने सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीत गौतमसिंग याच्याकडे एक किलो 40 ग्रॅम हेरॉईन सापडले, तर बंटी अली याच्याकडे एक किलो 40 ग्रॅम हेरॉईन सापडले. त्यानंतर या आरोपींना अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक करण्यात आली. दोघांनाही न्यायालयाने 9 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. दोघांवरही अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: mumbai news 2 arrested with 2 crore rupees heroin