रक्षाबंधनानिमित्त दोन दिवस दोन हजार जादा एसटी बस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

मुंबई - रक्षाबंधनानिमित्त एसटी महामंडळ सुमारे दोन हजार जादा बस सोमवारपासून (ता. 7) दोन दिवस सोडणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली एसटी बस स्थानके आणि बसथांब्यांवर कर्मचारी नेमून प्रवाशांना एसटीचा लाभ घेण्यास प्रोत्साहन द्यावे, असे निर्देश परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिले आहेत.

यापूर्वी स्थानिक पातळीवर गर्दी बघून एसटी बसचे नियोजन केले जात असे. यंदापासून रक्षाबंधनाच्या दिवशी सोडल्या जाणाऱ्या जादा वाहतुकीमधे सुसूत्रता आणण्यासाठी एसटी मुख्यालयातूनच राज्य पातळीवर नियोजन करण्यात आले आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी एसटीला जास्त प्रवासी व उत्पन्न मिळत असते. यंदाही जादा वाहतूक करून चांगले उत्पन्न मिळवण्याचे उद्दिष्ट एसटीने ठेवले आहे. गतवर्षी 18 ऑगस्टला रक्षाबंधन होते. त्या दिवशी 18 कोटी व दुसऱ्या दिवशी 19 कोटी 50 लाखांचे उत्पन्न मिळाले होते. त्या महिन्यातील दैनंदिन सरासरी उत्पन्नापेक्षा 6 कोटी 50 लाखांनी ते अधिक होते.

या वेळी रक्षाबंधनाच्या दिवशी जादा बस सोडताना प्रमुख बस स्थानकांवर प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रवासीमित्र नेमले जातील. जादा वाहतुकीची माहिती देण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाईल.

Web Title: mumbai news 2000 extra st bus for rakshabandhan