शीवमधील 25 इमारतींवर कारवाईला अंतरिम मनाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

मुंबई - शीव-कोळीवाडा येथील पंजाबी सोसायटीमधील 25 धोकादायक इमारतींवरील मुंबई महापालिकेच्या कारवाईला बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम मनाई केली.

मुंबई - शीव-कोळीवाडा येथील पंजाबी सोसायटीमधील 25 धोकादायक इमारतींवरील मुंबई महापालिकेच्या कारवाईला बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम मनाई केली.

30 वर्षांहून अधिक जुन्या झालेल्या या इमारतींमधील रहिवाशांना घरे रिकामी करण्याची नोटीस महापालिकेने काही दिवसांपूर्वी दिली आहे. या इमारती राहण्यासाठी धोकादायक असून, मोडकळीस आल्या आहेत, असा "स्ट्रक्‍चरल ऑडिट'चा अहवाल महापालिकेने दिला आहे; मात्र रहिवाशांनी स्वतंत्रपणे केलेल्या "ऑडिट'नुसार इमारतींची दुरुस्ती होऊ शकते. त्यामुळे पालिकेला कारवाई करण्यास मनाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यासंदर्भात रहिवाशांनी न्यायालयात यांच्यामार्फत याचिका केली आहे. न्यायाधीश अभय ओक यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. स्वतःच्या जबाबदारीवर इमारतींमध्ये राहतो, असे हमीपत्र महापालिकेला देण्याचे निर्देश न्यायालयाने यापूर्वीच रहिवाशांना दिले आहेत. तसेच 25 पैकी 14 इमारतींबाबत दिवाणी न्यायालयातही दावा दाखल आहे. अन्य याचिकांवर शुक्रवारी (ता. 9) सुनावणी होणार आहे.

Web Title: mumbai news 25 building crime stop in shiv