esakal | मुंबईत दोन महिन्यांत 2.5 लाख नव्या कोरोना रुग्णांची भर

बोलून बातमी शोधा

Mumbai corona Virus
मुंबईत दोन महिन्यांत 2.5 लाख नव्या कोरोना रुग्णांची भर
sakal_logo
By
भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मुंबईत गेल्या दोन महिन्यात 2.50 लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार, दुसऱ्या लाटेत तरुण वर्गाला जास्त विळखा बसला असून गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी 0 ते 49 वयोगटातील 64 टक्के रुग्ण सापडले आहेत. हे प्रमाण गेल्या वर्षी 56 टक्के एवढे होते. दरम्यान 0 ते 49 या वयोगटातील लोकांच्या मृत्यूंचे प्रमाण 50 ते 90 या वयोगटातील लोकांच्या तुलनेत कमी आहे.

यावर्षी 20 फेब्रुवारी ते 20 एप्रिल दरम्यान मुंबईत 2,51,386 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 1,60,643 रुग्ण 0 ते 49 वर्षे वयोगटातील आहेत. आकडेवारीनुसार, या दोन महिन्यांत मुंबईत 971 मृत्यूची नोंद झाली असून त्यापैकी 91% हे 50 ते 90 वयोगटातील आहेत. म्हणजेच ज्येष्ठांच्या मृत्यूंचे प्रमाण अजूनही जास्त आहे. तर, सर्वाधिक सक्रिय सहभाग 30 ते 30 या वयोगटातील लोकांचा आहे. ही संख्या 53 हजार 588 एवढी आहे. त्यापाठोपाठ 40 ते 99 वयोगटातील 45 हजार 506 रुग्ण आहेत. आणि 20 ते 29 या वयोगटातील 44 हजार 374 एवढे रुग्ण आहेत.

हेही वाचा: Maharashtra Lockdown: 'ST केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच'

पालिका अधिकाऱ्यांच्या मते, दुसऱ्या लाटेच्या तुलनेत पहिल्या लाटेत तरुणांना संसर्ग होण्याचे प्रमाण कमी होते. तर लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये 10 ते 19 वर्षे वयोगटातील संसर्गाचे प्रमाण वाढले आहे असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार, या दोन महिन्यांत 10 ते 19 या वयोगटातील 12 हजार 889 संसर्ग झाला आहे. 20 फेब्रुवारीपर्यंतच्या आकडेवारीपेक्षा हा आकडा खूपच जास्त आहे. मार्च 2020 मध्ये जेव्हा महामारीला सुरुवात झाली तेव्हा 10 ते 19 वर्षे वयोगटातील 12 हजार 221 किशोरवयीन मुलांना संसर्ग झाला होता. पहिल्या लाटेत कोविड 19 चे दोन लाख रुग्णांचा टप्पा ओलांडण्यास मुंबईत सात महिने लागले होते. पण आता अवघ्या दोन महिन्यांत हा आकडा गाठला आहे.

हेही वाचा: Mumbai Covid 19: कोविडच्या दुसऱ्या लाटेत मुंबई बेहाल

मृत्यू प्रमाण कमी

तज्ज्ञांच्या मते,  सध्याच्या लाटेमुळे अधिक तरुणांना संसर्ग झाला असला तरी मृत्यूचे प्रमाण कमी आहे. 45 वर्षांखालील तरुणांना यावेळी अधिक संसर्ग होत आहे. मुख्यत: एकत्र जमल्यामुळे संक्रमणाचा वेगवान प्रसार होतो. काही प्रमाणात त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासते. मात्र त्यांच्यात बरे होण्याचे प्रमाण ही चांगले आहे अशी माहिती राज्य सरकारच्या मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी दिली.

शिवाय डॉ. सुपे यांनी तरुणांना आवाहन केले आहे की, काही दिवसांच्या संसर्गानंतर तरुण रुग्णांची लक्षणे तीव्र होऊ शकतात. “डबल म्युंटट व्हायरसमुळे रूग्णांच्या क्लिनिकल ट्रेंडमध्ये बदल झाल्याचे लक्षात आले आहे. तरुण रूग्ण काही दिवस ठिक असतात. पण अचानक सात ते आठ दिवसानंतर त्यांची लक्षणे वाढतात."

हेही वाचा: Corona Virus: मुंबईत कोरोना बाधितांचा आकडा 6 लाखांच्या पार

आकडेवारीनुसार, 40 ते 49 वयोगटातील  63 रुग्णांनी आपले प्राण गमावले आणि त्यानंतर 30 ते 39 वयोगटातील 18 जणांचा मृत्यू झाला. शहराच्या तुलनेत नवीन कोविड लाटेमुळे पश्चिम उपनगरे अधिक प्रभावित होत आहेत. ही लाट कमी प्राणघातक जरी असली तरी जास्त प्रमाणात संसर्गजन्य आहे, असेही डॉ. सुपे म्हणाले. 

-------------------------

(संपादन- पूजा विचारे)

mumbai news 2.5 lakh new corona patients city in two months