तीन लाख इमारतींवर अग्निशामक दलाचा वॉच

किरण कारंडे
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

मुंबई - कमला मिल कंपाउंडमध्ये लागलेल्या आगीच्या पार्श्‍वभूमीवर अग्निशामक दल मुंबई शहर-उपनगरांतील सुमारे तीन लाख इमारतींवर बिल्डिंग इन्स्पेक्‍शन सीस्टिम या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लक्ष ठेवणार आहे. इमारतींमध्ये अग्निप्रतिबंधक यंत्रणा योग्य पद्धतीने कार्यान्वित आहे का, हे या सॉफ्टवेअरद्वारे तपासले जाणार आहे.

अग्निप्रतिबंधक यंत्रणा बसवण्यासंदर्भात; तसेच ती वेळोवेळी अद्ययावत करण्यासंदर्भात अग्निशामक दलातर्फे सोसायट्यांना वेळोवेळी नोटिसा बजावण्यात येतात. तरीही अनेक सोसायट्या त्याबाबत उदासीन असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्‍वभूमीवर इमारतींमध्ये हे सॉफ्टवेअर बसवण्यात येणार आहे. इमारतींतील अग्निप्रतिबंधक यंत्रणेत त्रुटी आढळल्यास किंवा ती बसवण्यास टाळाटाळ करणाऱ्या सोसायट्यांना अग्निशामक दलातर्फे ई-मेलद्वारे नोटीस बजावण्यात येईल. या त्रुटी दूर करण्यासाठी किंवा अग्निप्रतिबंधक यंत्रणा बसवण्यासाठी संबंधितांना 30 दिवसांची मुदत देण्यात येईल. नोटिशीकडे दुर्लक्ष करणाऱ्या सोसायट्यांकडून दंड आकारण्यात येईल, प्रसंगी संबंधितांवर खटले दाखल करण्याची तयारी अग्निशामक दलाने केली आहे. सोसायट्यांमध्ये अग्निप्रतिबंधक यंत्रणा योग्य पद्धतीने कार्यान्वित आहे का, याची नोंद यापूर्वी "मॅन्युअल' पद्धतीने करण्यात येत होती; मात्र त्यात अनेक त्रुटी राहत होत्या. या सॉफ्टवेअरमुळे या त्रुटी दूर होतील; तसेच संबंधित माहिती वेळोवेळी "अपडेट' केली जाईल, अशी माहिती अग्निशामक दलाच्या एका अधिकाऱ्याने दिली.

Web Title: mumbai news 3 lakh building fire brigade watch