देशात 31 नवे विमानतळ होणार : जयंत सिन्हा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

एकूण 150 ते 200 विमानतळांची गरज 

मुंबई - भारताची वाढत जाणारी लोकसंख्या आणि प्रवासी पाहता भारतात 150 ते 200 विमानतळांची गरज असल्याचे मत नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी व्यक्त केले. येत्या काळात जवळपास 31 नवीन विमानतळ देशात होणार असून, त्यामुळे एकूण विमानतळांची संख्या ही 106 पर्यंत जाईल.

विमानतळातील गुंतवणूक यावर मुंबईत परिषद होत आहे. त्यावेळी विमानतळांचा होणारा विकास त्यांची गरज, सुरक्षा याविषयी माहिती दिली. सध्या अमेरिकेत 500 तर चीनमध्ये 300 विमानतळं आहेत. हे पाहता आपल्याकडील विमानतळ संख्या फ़ार कमी आहे. भारतात विमान प्रवाशांची संख्या गेल्या 3 वर्षात वाढली आहे.

सध्याच्या घडीला 117 दशलक्ष प्रवासी प्रवास करतात. पुढील 5 ते 10 वर्षात ती 500 दशलक्षांपर्यंत जाईल. त्यामुळे आणखी 150 ते 200 विमानतळांची गरज भारताला असून, त्यासाठी 2 ते 3 लाख कोटींची गुंतवणूक करणेही तेवढेच आवश्यक असल्याचे सिन्हा म्हणाले.

Web Title: mumbai news 31 new airports civil aviation