बंदुकीच्या धाकाने 35 लाखांची लूट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

मुंबई - खार परिसरातील एका 66 वर्षीय महिलेला बांधून बंदुकीच्या धाकाने 35 लाख लुटल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हे दोघेही त्यांच्या आचाऱ्याचे साथीदार आहेत.

मुंबई - खार परिसरातील एका 66 वर्षीय महिलेला बांधून बंदुकीच्या धाकाने 35 लाख लुटल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हे दोघेही त्यांच्या आचाऱ्याचे साथीदार आहेत.

हाशिम आसिक अली शेख (30) आणि संतोष रामण्णा घोगे (21) अशी आरोपींची नावे आहेत. खार येथील मुरूमल मॅन्शन इमारतीच्या सातव्या मजल्यावर राहणाऱ्या कौसल्या गुरबानी (वय 66) यांचे पती आणि इतर कुटुंबीय गुरुवारी (ता. 31) बाहेर गेले होते. सायंकाळी त्यांचा आचारी घरी आला. काही वेळाने त्याचे दोन साथीदारही आले. त्यांनी कौसल्या यांना दोरीने खुर्चीला बांधले आणि त्यांना बंदुकीचा धाक दाखवून 35 लाखांचा मुद्देमाल लुटला. आचारी राजू याचा पोलिस शोध घेत आहेत.

Web Title: mumbai news 35 lakh loot

टॅग्स