मुंबई शहरामध्ये 36 'गुड मॉर्निंग' पथके

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

मुंबई - केंद्र सरकारने मुंबईला हागणदारीमुक्त शहर घोषित केले आहे. हे स्थान कायम ठेवण्यासाठी महापालिकेने शहरात 180 कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली 36 "गुड मॉर्निंग' पथके तैनात केली आहेत.

मुंबई - केंद्र सरकारने मुंबईला हागणदारीमुक्त शहर घोषित केले आहे. हे स्थान कायम ठेवण्यासाठी महापालिकेने शहरात 180 कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली 36 "गुड मॉर्निंग' पथके तैनात केली आहेत.

हागणदारीमुक्त शहर मोहिमेबाबत जागृती करण्याचे, तसेच जनजागृती केल्यानंतर उघड्यावर नैसर्गिक विधी करणाऱ्यांकडून दंड वसूल करण्याची जबाबदारी या पथकांवर सोपवण्यात आली आहे. या पथकांनी 15 दिवसांत 57 हजार 600 रुपयांचा दंड वसूल केला आहे. केंद्र सरकारने "स्वच्छ भारत अभियाना'तील निकषांनुसार मुंबई हागणदारीमुक्त झाल्याचे घोषित केले आहे. कोणतेही क्षेत्र हागणदारीमुक्त घोषित करण्यासाठी तीन प्रमुख निकष ठरवण्यात आले आहेत. नागरिकांना त्यांच्या निवासी परिसराच्या पाचशे मीटरच्या परिघात शौचालये उपलब्ध करून देणे, शौचालय वापरण्याबाबत जागृती करणे, तसेच शौचालय उपलब्ध असूनही, तसेच प्रबोधन झाल्यानंतरही शौचालयाचा वापर न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे हे ते निकष आहेत. पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यावर या मोहिमेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Web Title: mumbai news 36 good morning team