400 परदेशी पर्यटक विसर्जनासाठी मुंबईत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

मुंबई - राज्यातच नव्हे; तर जगभरात मुंबईतील गणेशोत्सवाची आणि गणेश विसर्जनाची उत्सुकता असते. यंदा प्रथमच परदेशी पर्यटकांसाठी गिरगाव चौपाटीवर विसर्जन पाहण्याकरिता खास व्यवस्था करण्यात आली आहे. परदेशी पर्यटकांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून अमेरिका, जपान आदी देशांतील तब्बल 400 हून अधिक पर्यटक मुंबईत येणार आहेत.

गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याची आणि संपूर्ण विसर्जन सोहळा पाहण्याची इच्छा अनेक परदेशी पर्यटकांना असते; मात्र अनेकदा सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना यापासून दूर राहावे लागते. यंदा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि मुंबई महापालिकेने गिरगाव चौपाटीवर परदेशी पर्यटकांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. तब्बल 200 पर्यटकांना एकाच वेळी तासभर विसर्जन मिरवणूक पाहता येणार आहे. तसेच, मुंबईतील गणेशोत्सवाच्या इतिहासापासून आतापर्यंतची गणेशोत्सवाची वाटचालही पर्यटकांना पाहता येईल. अमेरिका, जपान, जर्मनी, चीन, थायलंड आदी देशांतील पर्यटकांनी यासाठी उत्सुकता दाखवली. तब्बल 400 हून अधिक परदेशी पर्यटक विसर्जन मिरवणुकीच्या सोहळ्याचा आनंद घेणार आहेत.

Web Title: mumbai news 400 foreigner in mumbai for ganpati visarjan