म्हाडाच्या सोडतीसाठी 67 हजार अर्जदार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

मुंबई - म्हाडाच्या मुंबई मंडळाने विविध विभागांतील घरांच्या विक्रीसाठी जाहिरात दिली आहे. या सोडतीसाठी अखेरच्या मुदतीपर्यंत 66 हजार 780 अर्जदारांनी नोंदणी केली आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत 77 हजार 521 जणांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. त्यापैकी 50 हजार 487 अर्जदारांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले असल्याने या अर्जदारांचा सोडतीतील प्रवेश निश्‍चित झाला आहे.

अर्जदारांना बुधवारी (ता. 25) रात्री 11.59 पर्यंत अनामत रक्कम भरता येणार आहे. त्यासाठी एनईएफटी-आरटीजीएस प्रणाली वापरावी लागेल. म्हाडाने मुंबईतील विविध ठिकाणच्या 819 घरांच्या सोडतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. गतवर्षी 972 घरांसाठी दोन लाख जणांनी नोंदणी केली होती. यंदाच्या सोडतीला खूपच कमी प्रतिसाद मिळाला आहे. 10 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सोडत काढण्यात येणार आहे. एनईएफटी-आरटीजीएसद्वारे अनामत रक्कम भरण्यासाठी चलन निर्मिती बुधवारी (ता. 25) रात्री 11.59 पर्यंत करता येणार आहे. ऑनलाईन पेमेंट गुरुवारी रात्री 11.59 पर्यंत करता येईल. एनईएफटी-आरटीजीएसद्वारे अनामत रक्कम बॅंकेच्या कार्यालयीन वेळेत भरता येईल.

Web Title: mumbai news 67 thousand form for mhada draw