सात विद्यार्थ्यांविरोधात रॅगिंगप्रकरणी गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

मुंबई - मध्य मुंबईतील प्रसिद्ध वास्तुविशारद महाविद्यालयात विद्यार्थिनीवर रॅगिंग केल्याप्रकरणी तिच्यासोबत शिकणाऱ्या सात विद्यार्थ्यांविरोधात दादर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रॅगिंगला कंटाळून ही तरुणी महाविद्यालयात जाण्यास टाळाटाळ करू लागली, तेव्हा कुटुंबीयांच्या हा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी महाविद्यालयाने अंतर्गत चौकशी केली.

आरोपी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील वार्षिक कार्यक्रमात तरुणीचे छायाचित्र हातात पकडून "शूट आऊट ऍट वडाळा' या चित्रपटातील एका आयटम सॉंगवर नृत्य केले होते. त्यानंतर या नृत्याची चित्रफीत सोशल मीडियावर अपलोड करण्यात आली. महाविद्यालयाच्या असाईन्मेंटसाठी ही विद्यार्थिनी आरोपी विद्यार्थ्यांच्या गटामध्ये होती. त्या वेळी एका ठिकाणी जमण्याचे ठरले होते; पण तरुणी उशिरा पोचल्यामुळे आरोपींनी तिचे नाव असाईन्मेंटमध्ये घेण्यास नकार दिला. नाव समाविष्ट करण्यासाठी त्यांनी तिला नृत्य करण्यास भाग पाडले. त्याची चित्रफीत काढून व्हॉट्‌सऍप ग्रुपवर अपलोड केली. आणखी एका मित्राकडून तिचे मॉर्फ केलेले छायाचित्रही वापरल्याचे समजले. या सर्व घटनांमुळे मुलगी खूप निराश झाली होती. ती महाविद्यालयात जाणे टाळू लागली होती. कुटुंबीयांनी चौकशी केल्यावर हे उघड झाले. त्यांनी महाविद्यालयाच्या प्रशासनाकडे तक्रार केल्यावर एक समिती स्थापन करून चौकशी केली. त्यानंतर दादर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली.

Web Title: mumbai news 7 student crime by ragging