मुंबईच्या 'झोपु' योजनेतील 80 टक्के कर्मचारी कंत्राटी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

मुंबई - शहर आणि उपनगरे झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी स्थापन झालेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा (एसआरए) कारभार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हाती सोपवण्यात आला आहे. येथील 403 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपैकी 80 टक्के कर्मचारी कंत्राटी असल्याची माहिती उघड झाली आहे.

प्राधिकरणाच्या मुंबई कार्यालयासाठी आकृतिबंधानुसार 99 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 65 भरण्यात आली असून, 36 पदे रिक्त आहेत. त्यात एक विधी सल्लागार, एक अवर सचिव, पाच नायब तहसीलदार आणि दुय्यम अभियंत्यांची 18 पदे रिक्त आहेत. 73 अधिकारी आणि कर्मचारी प्रतिनियुक्तीवर आहेत. याशिवाय ईगल सिक्‍युरिटी ऍण्ड पर्सनल सर्व्हिसेसकडील 75 लिपिक आहेत. ईगल सिक्‍युरिटी ऍण्ड पर्सनल सर्व्हिसेसचे 38 शिपाई आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने 98 लिपिक आणि शिपाई कंत्राटी पद्धतीने नेमले आहेत. 54 सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी महत्त्वाच्या पदांवर आहेत.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी "एसएआरए'तील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची माहिती मागितली होती. प्राधिकरणाने त्यांना सरकारनियुक्त तसेच कंत्राटी पद्धती आणि सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी दिली आहे. त्यातील सुमारे 80 टक्के कर्मचारी कंत्राटी आहेत.

Web Title: mumbai news 80% contract employee in zopu scheme