नऊ दुचाकीस्वारांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

मुंबई - दुचाकींची शर्यत खेळणाऱ्या नऊ तरुणांना गावदेवी पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. गंभीर बाब म्हणजे आरोपींनी त्यांची दुचाकी पोलिस शिपायाच्या अंगावर घालून त्याला जखमी केले. अटक केलेल्या आरोपींमध्ये चार अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

तक्रारदार पोलिस शिपाई दिलीप साळुंखे हे पेडर रोड येथे गस्त घालताना काही जण भरधाव दुचाकींवरून तेथे येत असल्याची माहिती त्यांना नियंत्रण कक्षाकडून मिळाली. त्यानुसार साळुंखे कॅडबरी जंक्‍शन येथे दुचाकीसह उभे होते. चार-पाच तरुण विनाहेल्मेट भरधाव दुचाकीवरून येत असल्याचे पाहिल्यावर त्यांनी हात करून थांबण्यास सांगितले; पण त्यांनी न थांबता तेथून पळ काढला. त्यानंतर साळुंखे यांनी दुचाकीवरून पाठलाग करून कॅडबरी जंक्‍शनच्या पुढे जाऊन त्या तरुणांना ताब्यात घेतले.

Web Title: mumbai news 9 biker arrested