आधार कार्ड  अपडेटसाठी धावपळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

खारघर - आधार कार्ड अपटेड करण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे; मात्र खारघरमध्ये त्याकरिता एकही केंद्र नसल्याने गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. सरकारी कार्यालयातील कामे, बॅंका, सीम कार्ड आदींकरिता आधारचा क्रमांक दिल्यानंतर बायोमेट्रिक पद्धतीने अंगठा देताना कार्ड अपेडट नसल्याचे सांगण्यात आल्याने तारांबळ उडत आहे. 

बॅंकत नवे खाते उघडण्यासह जुन्या खातेधारकांनाही बॅंकेने आधार कार्ड सक्तीचे केले आहे. काही मोबाईल कंपन्यांकडूनही ग्राहकांकडे आधार कार्डची मागणी होत आहे; मात्र आधार कार्ड अपडेट नसल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांची धावपळ होत आहे. पत्ता व इतर बाबींच्या बदलासह आधार कार्ड बायोमेट्रिक पद्धतीने अपडेट करण्यासाठी नागरिक केंद्रांच्या शोधात भटकत आहेत. खारघरमध्ये आधार कार्ड नोंदणी केंद्र नसल्याने नागरिकांना पनवेल, नवी मुंबईकडे धाव घ्यावी लागत आहे. सीबीडी सेक्‍टर ११ मधील एका केंद्रात माहिती घेतली असता, पत्ता, जन्म तारीख, नावातील चुका आदींसाठी नागरिक येत असल्याचे त्यांनी सांगितले.

आधार कार्ड नोंदणी केंद्रे सध्या सरकारने बंद केली आहेत. त्यामुळे अपडेटची कामे थांबली आहेत. १ ऑगस्टपासून केंद्रे सुरू केली जातील. खासगी संस्थांना ती चालवण्यास दिली गेली आहेत. खारघरमध्ये पूर्वी काही संस्था आधार कार्ड नोंदणीचे काम करत होते.  
- बी. टी. गोसावी, नायब तहसीलदार, पनवेल

Web Title: mumbai news aadhar card