आकाश जाधव याला मारहाणीच्या गुन्ह्यात अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

मुंबई - शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणात तीन वर्षे सुधारगृहात राहून आलेला अल्पवयीन आरोपी आकाश जाधव (वय 22) याला आग्रीपाडा पोलिसांनी मारहाणीच्या गुन्ह्यात अटक केली. हा आकाशविरोधातील चौथा गुन्हा आहे; तसेच दोन अदखलपात्र गुन्हेही दाखल आहेत. यापूर्वीही एन. एम. जोशी पोलिसांनी आकाशला अटक केली होती.

तक्रारदार बाळाराम गणपत कदम (वय 48) हे सात रस्ता येथे राहतात. कदम यांना 28 मार्चच्या मध्यरात्री आकाश जाधव आणि त्याचे दोन साथीदार आकाश गडकरी व सिद्धेश तोंडवलकर यांनी लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण करून धमकावले. सात रस्ता परिसरातील शनी मंदिराजवळ हा प्रकार घडला. त्यानंतर कदम यांनी याबाबतची माहिती आग्रीपाडा पोलिसांना दिली. गुरुवारी सकाळी या तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून आग्रीपाडा पोलिसांनी आकाश जाधव व आकाश गडकरी या दोघांना अटक केली. त्यानंतर शुक्रवारी (ता. 30) सिद्धेश तोंडवलकरला याप्रकरणी अटक करण्यात आली. शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणात अल्पवयीन असल्याने आकाश जाधवला तीन वर्षे बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Web Title: mumbai news aakash jadhav arrested