'आत्मक्‍लेश यात्रा' बुधवारी राजभवनावर धडकणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

मुंबई - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या आत्मक्‍लेश यात्रेने मुंबईत प्रवेश केला असून, ही यात्रा बुधवारी राजभवनावर धडकणार आहे. तेथे शेतकऱ्यांच्या समस्यांविषयीचे निवेदन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना देण्यात येणार आहे. पनवेल, नवी मुंबई, मानखुर्द या मार्गे या यात्रेचे मुंबईत आगमन झाले असून, उद्याचा मुक्‍काम लालबाग, परळ येथे होणार आहे. त्यानंतर परवा म्हणजे बुधवारी ही यात्रा राजभवनावर धडकेल. या ठिकाणी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी "स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

दरम्यान, मुंबईत ठिकठिकाणी शिवसेनेच्या शाखाप्रमुखांनी या यात्रेचे स्वागत केले. आज आमदार कपिल पाटील यांनी या यात्रेला पाठिंबा दर्शवला, तर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी फोनवरून संपर्क साधत पाठिंबा दिला.

Web Title: mumbai news aatmaclesh yatra