सपाच्या आंदोलनात अबू आझमी फिरकलेच नाही

दिनेश चिलप मराठे
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

मुंबई: सांगली येथे परप्रांतीयांवर मनसेने हल्ला केला त्याचा निषेध करण्यासाठी आझाद मैदान येथे समाजवादी पार्टी तर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे सपाचे महाराष्ट्र अध्यक्ष अबू आझमी हे आंदोलनात सहभागी न झाल्याने कार्यकर्त्यांनी आणि प्रसार माध्यमांनी पाठ फिरविल्याने आंदोलनाची हवाच निघाली.

आंदोलनाची धग कायम ठेवण्यासाठी सपा नगरसेवक रईस शेख, लल्लन यादव, इक़्बाल शेख, फोवाज मेमन यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. भारत हा सर्वधर्म समभाव मानणारा समाजवादी देश आहे. येथे व्यक्ति आणि संचार स्वातंत्र्य आहे, त्यामुळे सांगली सारखी घटना पुन्हा घडल्यास समाजवादी पार्टी त्यास आपल्या पद्धतीने जबाब देईल असे म्हटले.

Web Title: mumbai news Abu Azmi did not visit against SP movement