नववर्षात धावणार वातानुकूलित लोकल

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

मुंबई - बहुचर्चित व बहुप्रतिक्षित वातानुकूलित लोकलची प्रवाशांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. नववर्षाच्या मुहूर्तावर एक जानेवारीला वातानुकूलित लोकल मुंबईत प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. ही माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी बुधवारी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली.

मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वेमधून दररोज 65 लाख लोक प्रवास करतात. त्यातील 35 लाख पश्‍चिम रेल्वेने प्रवास करतात. वर्षभरापूर्वी मुंबईसाठी वातानुकूलित लोकल आणण्याचे ठरले होते. प्रथम पश्‍चिम रेल्वेवर वातानुकूलित लोकल धावणार असून, दिवसाला सात फेऱ्या होणार आहेत. पश्‍चिम रेल्वेवर या वातानुकूलित लोकलची चाचणी सुरू आहे. या लोकलचे भाडे दिल्लीतील मेट्रोचे तिकीट किंवा प्रथम श्रेणीच्या तिकिटाइतके असेल. रेल्वेने मुंबईसाठी नऊ वातानुकूलित लोकल खरेदी केल्या आहेत. या लोकल पश्‍चिम आणि मध्य रेल्वेवर धावतील. ऑक्‍टोबरमध्ये वातानुकूलित लोकल सुरू करण्याचे नियोजन होते, मात्र काही तांत्रिक बाबींमुळे विलंब झाला.

Web Title: mumbai news ac local in new year