मुंबईत एसी लोकल ऑक्‍टोबरपासून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

नवीन वेळापत्रकात एसी लोकलच्या फेऱ्यांचा समावेश करण्याचे नियोजन आहे. सध्या या लोकलच्या चाचण्या सुरू आहेत.
- मुकुल जैन, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पश्‍चिम रेल्वे

मुंबई - मुंबईत दाखल झालेल्या एसी लोकलच्या चाचण्या पश्‍चिम रेल्वे मार्गावर घेण्यात येत आहेत. आतापर्यंत घेण्यात आलेल्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. आणखी काही चाचण्या झाल्यानंतर ही लोकल ऑक्‍टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्‍यता आहे. पश्‍चिम रेल्वेच्या नवीन वेळापत्रकात या लोकलच्या फेऱ्यांचा समावेश करण्याचा प्रस्ताव असल्याचे समजते.

एसी लोकल वर्षभरापूर्वी मुंबईत दाखल झाली. सुरवातीला मध्य रेल्वे मार्गावर या लोकलच्या चाचण्या घेण्यात आल्या; मात्र एसी लोकलची असलेली अधिक उंची व सीएसएमटी ते कुर्लादरम्यान कमी उंचीचे पूल यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने ही लोकल चालवण्यास नकार दिला. त्यानंतर पश्‍चिम रेल्वेने ही लोकल चालवण्यात स्वारस्य दाखवले. या मार्गावर तीन महिन्यांपासून एसी लोकलच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. आणखी काही चाचण्या झाल्यानंतर ही लोकल ऑक्‍टोबरपासून पश्‍चिम रेल्वे मार्गावर धावेल. या लोकलच्या सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळेत 12 फेऱ्या होतील.

Web Title: mumbai news ac local in october