चालकाच्या डुलकीमुळे मोटार थेट समुद्रात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

मुंबई - चालकाला डुलकी लागल्याने नियंत्रण सुटून भरधाव मोटार थेट समुद्रात पडल्याची घटना हाजीअलीजवळ गुरुवारी पहाटे घडली. या अपघातात काही जण किरकोळ जखमी झाले. चालक अब्दुल रशीद याला ताडदेव पोलिसांनी अटक केली आहे.

दादर येथील आदित्य तावडे याने मित्रांना मुंबई दाखवण्यासाठी अब्दुल रशीद याची मोटार आरक्षित केली होती. बुधवारी (ता.27) रात्री या सर्वांना घेऊन अब्दुल मोटारीने निघाला होता. आज पहाटे साडेचारच्या सुमारास हाजीअली जंक्‍शनवर अब्दुलला डुलकी लागल्याने मोटारीवरील नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या बाजूला असलेले अडथळे तोडून गाडी समुद्रात कोसळली.

दगडावर आदळल्याने मोटारीचा चक्काचूर झाला. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात आले.

Web Title: mumbai news accident