मुंबई - अहमदाबाद महामार्गावर अपघात; दोन मृत्युमुखी

अच्युत पाटील
रविवार, 1 ऑक्टोबर 2017

गुजरातकडून मुंबईकडे चाललेल्या कारमध्ये मुलाचे वडील, मुलगा व सुन असे तीन प्रवासी होते. चारोटीपासून दोनशे मीटर अंतरावर असलेल्या नदीवर नव्याने बांधलेल्या पुलावरून गाडी नदीत पडून अपघात झाला

बोर्डी(पालघर)  - मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील चारोटी येथे आज (रविवार) पहाटे कारच्या अपघातात दोन मृत्युमुखी; तर एक गंभीर जखमी झाला. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.

गुजरातकडून मुंबईकडे चाललेल्या कारमध्ये मुलाचे वडील, मुलगा व सुन असे तीन प्रवासी होते. चारोटीपासून दोनशे मीटर अंतरावर असलेल्या नदीवर नव्याने बांधलेल्या पुलावरून गाडी नदीत पडून अपघात झाला.

नव्याने सुरू केलेल्या पुलाला लोखंडी रेलिंग लावलेली नसल्याने चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात झाला. याच नदीत एक वर्षापुर्वी एक कार कोसळली होती. पंधरा दिवसापूर्वी मेंढवण खिंडित रेलिंग नसल्याने अपघात होवून एक महिलेचा बळी गेला होता. आयआरबीच्या निष्क्रियतेमुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावर अपघाताची मालिकाच सुरू असून निष्पाप लोकांचे विनाकारण बळी जात असल्याची तीव्र प्रतिक्रिया मानव अधिकार कक्षाचे अध्यक्ष हरबंससिंग नन्नाडे यांनी व्यक्त केली.

Web Title: mumbai news: accident