सर्वाधिक रस्ते अपघात रात्रीच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जानेवारी 2018

मुंबई - राज्यात होणारे रस्ते अपघात हे सायंकाळी ४ ते मध्यरात्री १२ यादरम्यान सर्वाधिक होतात. १०८ क्रमांकाच्या आपत्कालीन सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेतून मागील तीन वर्षांत रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्ण संख्येवरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. 

मुंबई - राज्यात होणारे रस्ते अपघात हे सायंकाळी ४ ते मध्यरात्री १२ यादरम्यान सर्वाधिक होतात. १०८ क्रमांकाच्या आपत्कालीन सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेतून मागील तीन वर्षांत रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्ण संख्येवरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. 

महाराष्ट्र सरकारतर्फे चालविण्यात येणाऱ्या या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून २०१४ ते २०१७ दरम्यान सुमारे २ लाख ३६ हजार ३७६ अपघातग्रस्त रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. राज्यात झालेल्या रस्ते अपघातातील ५० टक्के अपघातग्रस्तांना १०८ च्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले आहे. १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार वाहतूक कोंडी आणि मद्यपान करून गाडी चालविणे या दोन कारणांमुळे होणाऱ्या अपघाताचे प्रमाण अधिक आहे. 

२०१४ ते २०१७ या वर्षात रस्ते अपघातामध्ये १६२ टक्के वाढ झाल्याचे या सर्व्हेमध्ये नमूद करण्यात आले आहे. २०१७ मध्ये ७४ हजार ११८ रुग्णांना या रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले आहे. यापैकी सर्वाधिक अपघात हे पुणे, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये झाले आहेत. त्या खालोखाल सोलापूर, सातारा, कोल्हापूर, जळगाव, नागपूर, या जिल्ह्यांमध्ये नोंदविण्यात आले आहेत.

नवीन गाडी आणि तरुण चालक यांच्या वाढत्या संख्येमुळे रस्ते सुरक्षा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा झाला आहे. यासाठी सरकारी पातळीवरून ठोस पावले उचलण्यात येत आहेत; मात्र वाहनचालक आणि पादचाऱ्यांनीही स्वतःची जबाबदारी ओळखण्याची आवश्‍यकता आहे. 
- हनुमंतराव गायकवाड (प्रमुख कार्यकारी संचालक, बीव्हीजी)

Web Title: mumbai news accident Most Road Accidents Nightly