प्रज्ञा सिंह, पुरोहित यांच्यावर सात फेब्रुवारीला आरोप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

मुंबई - मालेगाव बॉंबस्फोट खटल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह आणि कर्नल प्रसाद पुरोहितवर सात फेब्रुवारीला विशेष न्यायालयात आरोप निश्‍चित करण्यात येणार आहेत.

मुंबई - मालेगाव बॉंबस्फोट खटल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह आणि कर्नल प्रसाद पुरोहितवर सात फेब्रुवारीला विशेष न्यायालयात आरोप निश्‍चित करण्यात येणार आहेत.

आरोपी प्रज्ञा सिंह, पुरोहितसह अन्य आरोपींवर मोका कायद्यानुसार आरोप निश्‍चित होणार नाहीत, हे विशेष एनआयए न्यायालयाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता दहशतवादी कारवाया केल्याचे आरोप त्यांच्यावर निश्‍चित केले जाणार आहेत. प्रज्ञा सिंह, पुरोहित यांच्यासह अन्य दोन जणांवरील मोका न्यायालयाने रद्द केला आहे. मालेगावमध्ये सप्टेंबर 2008 मध्ये बॉंबस्फोट झाला होता. त्यात सात जण ठार झाले होते.

Web Title: mumbai news Accusation on pradnya sinh purohit