आचार्य महाविद्यालय प्लास्टिकविरोधात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

मुंबई - प्लास्टिकच्या अतिवापराने केवळ मानवी जीवनावरच नव्हे, तर निसर्गाच्या संपूर्ण चक्रालाच धोका पोहोचतो. पर्यावरणाच्या बेसुमार हानीमुळे येणारा भविष्यकाळ अत्यंत कठीण असल्याचे इको रॉक्‍सच्या सहसचिव रश्‍मी जोशी यांनी एन. जी. आचार्य आणि डी. के. मराठे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पटवून दिले. ‘सकाळ’च्या प्लास्टिकविरोधी मोहिमेत विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन प्लास्टिकही गोळा केले.

आपण कचऱ्यात टाकलेले प्लास्टिक अनेकदा प्राणी त्यांचे अन्न म्हणून खातात. अनेक गाई-म्हशींचा मृत्यूही प्लास्टिक खाण्याने होतो. केवळ मानवी जीवनावरच नव्हे, तर जंगलातील प्राणी, सागरी जीवसृष्टीही प्लास्टिकच्या अतिवापरामुळे धोक्‍यात आल्या आहेत. धोक्‍याची घंटा वाजली आहे. त्यानुसार आतापासून प्लास्टिकच्या बेसुमार वापराला आळा घातला पाहिजे; असे रश्‍मी जोशी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. केवळ प्लास्टिकच्या पिशव्याच नव्हे, तर दैनंदिन वापरातील प्लास्टिकच्या वस्तूंमधूनही सूक्ष्म वायू निघतो. तो आरोग्यासाठी अत्यंत हानीकारक असतो. असे सांगितल्यानंतर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वतःहून पुढाकार घेत वापरात असलेल्या प्लास्टिकच्या वस्तू रिसायकलिंगसाठी कलेक्‍शन बॉक्‍समध्ये जमा केल्या. या वेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या विद्यागौरी लेले, उपप्राचार्या अमिता लाल, गणित विभागाच्या माणिक टेंबे, वनस्पती शास्त्र विभागाच्या मार्गश्री भट आदी मान्यवर होते.

प्लास्टिक कलेक्‍शन स्पर्धा
वरिष्ठ महाविद्यालयातील वर्गामध्ये प्लास्टिक कलेक्‍शनची स्पर्धाही महाविद्यालयाने लावली असून जास्तीत जास्त प्लास्टिक जमा करणाऱ्या वर्गाला बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.

Web Title: mumbai news Acharya college against plastic