प्रेयसीचा प्रियकरावर ऍसिड हल्ला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

मुंबई - प्रियकर भेटत नसल्याने संतप्त झालेल्या प्रेयसीने त्याच्यावर ऍसिड हल्ला केल्याची घटना शुक्रवारी गोरेगावमध्ये उघडकीस आली. या घटनेत जखमी झालेल्या तरुणावर गोरेगावमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी प्रेयसीला अटक केली आहे. तिला बुधवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

ओमसिंग ओमान सोलंकी असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. गोरेगावमधील एका शॉपिंग सेंटरमध्ये सेल्समन म्हणून काम करणाऱ्या ओमसिंगची काही वर्षांपूर्वी या तरुणीशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले; मात्र ओमसिंग वारंवार भेटत नसल्याने ती निराश झाली होती. तिने ओमसिंगला गुरुवारी सायंकाळी गोरेगाव पश्‍चिमेकडील एका शॉपिंग सेंटरच्या परिसरात बोलावले. तो आल्यानंतर तिने त्याच्या अंगावर ऍसिड फेकले. या हल्ल्यात ओमसिंगच्या दंडावर आणि डोळ्याजवळ जखम झाली आहे.

Web Title: mumbai news acide attack