नशेत वाहन चालवणाऱ्या ६१६ जणांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

मुंबई - थर्टी फर्स्टनिमित्त रात्री दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या ६१६ जणांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. भरधाव वाहन चालवणाऱ्या ७,६०० जणांवर कारवाई झाली.

मुंबई - थर्टी फर्स्टनिमित्त रात्री दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या ६१६ जणांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. भरधाव वाहन चालवणाऱ्या ७,६०० जणांवर कारवाई झाली.

दारू पिऊन वाहन चालवण्याचे प्रकार रोखण्याकरता वाहतूक पोलिसांनी बार आणि हॉटेल मालकांना खबरदारी घेण्यास सांगितले होते. बारमधून मद्यधुंद अवस्थेत बाहेर पडणाऱ्यांसाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. रविवारी मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर येण्याची शक्‍यता लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी कारवाईकरता आराखडा तयार केला होता. प्रत्येक मुख्य चौकात दुपारी १२ वाजल्यापासूनच नाकाबंदी करण्यात आली होती. टप्प्याटप्प्याने नाकाबंदी लावल्यामुळे मद्यपी पोलिसांच्या जाळ्यात सापडत होते. वाहतूक पोलिसांनी ६१६ मद्यपीचालकांवर कारवाई केली. उपनगरातील २८५ जणांवर ही कारवाई झाली. ट्रिपल सिट, विना हेल्मेट, सीट बेल्ट न लावणे अशा चार हजार जणांवर कारवाईची नोंद आहे. सुसाट वाहन चालवणाऱ्या ७,६०० जणांवर पोलिसांनी कारवाई केली.

स्टंटबाजांची कोंडी
वांद्रे-वरळी सागरी सेतू परिसरात सुसाट वाहन चालवण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे परिसरातील यू टर्न उड्डाणपुलावर अपघात होतात. वाहतूक पोलिसांनी वांद्रे उड्डाणपुलाखाली आणि सेतू परिसरातून उड्डाणपुलाच्या दिशेला जाणाऱ्या मार्गावर नाकाबंदी केली होती. त्यामुळे भीतीपोटी स्टंटबाज चालक सेतू परिसरात फिरकलेच नाहीत.

Web Title: mumbai news Action against 616 people running intoxicant driving